कॉग्रेस पक्षाने विधानसभेला ४० मुस्लिम उमेदवार देण्याची मुस्लिम कॉग्रेस नेते यांची मागणी नाना पटोले यांनी फेटाळली...
औरंगाबाद येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मराठवाड्यातील प्रमुख मुस्लिम नेत्यांच्या बैठकीचे आयोजन हॉटेल फिदर येथे बैठक करण्यात आले होते मुस्लिम समाजाला विधान सभा निवडणूक व संघटनेत योग्य प्रतिनिधित्व मिळावे ,या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली या बैठकीत माजी आमदार माननीय श्री एम एम शेख, माजी आमदार बीड श्री सिराज देशमुख,माजी उपमहापौर लातूर श्री मोईज शेख , मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री हमद चाऊस औरंगाबाद , औरंगाबाद जिल्हा शहर अध्यक्ष युसुफ शेख ,उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष श्री खलील सय्यद,माजी महापौर नांदेड अब्दुल सत्तार शेख ,उपमहापौर ,श्री मसूद शेख , प्रदेश सरचिटणीस श्री हाफिज शेख हिंगोली ,,प्रदेश सचिव श्री खालेद पठाण ,प्रदेश उपाध्यक्ष श्री इब्राहिम पठाण,प्रदेश सरचिटणीस श्री कैसर आझाद सिल्लोड,श्री शकील मौलवी व माजी महापौर औरंगाबाद रशीद मामु सोलापूर श्री अरेफ शेख,माजी नगरसेवक श्री नादेरुल्लाह हुसेनी,उपनगराध्यक्ष श्री मोईनुद्दीन पठाण ,श्री मुहीब अहेमद, हमीद नवाज अख्तर ,श्री अयुब शेख ,माजी नगरसेवक श्री शेर अली नांदेड ,शहर जिल्हाध्यक्ष परभणी श्री नदीम इनामदार , श्री .फरीद देशमुख,डॉ सर्ताज पठाण,रोटी बँकेचे प्रणेते श्री युसुफ मुकाती ,श्री गुलाब पटेल,श्री मजहर पटेल,युसुफ हिरा पटेल ,इत्यादी सह असंख्य पदाधिकारी यांनी समाज बांधवांच्या सोबत राहण्याचा निश्चय केला प्रसिध्दी व पत्रकबाजी झाली
समाजमन व युवक यांच्यात उत्सव भरण्यात नेते मंडळीनी कमतरता भासू दिली नाही एवढे मात्र नक्की पण लागलीच विधानसभेच्या दृष्टिकोण समोर ठेऊन लातुर येथे दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले लातूर,धाराशिव,बीड जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संपन्न झाला
या समारंभास काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा.रमेश चेन्नीथला जी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले जी, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेबजी थोरात, विरोधी पक्षनेते मा.विजय वडेट्टीवार जी,माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख, विधान परिषदेचे गटनेते मा.सतेजजी पाटील,आमदार धीरज देशमुख , माजी आमदार वजाहद मिर्झा,नवनिर्वाचित खासदार वसंतरावजी चव्हाण डॉ. शिवाजी काळगे जी, डॉ.कल्याणजी काळे यांच्यासह मान्यवर नेते,प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
पक्षाला मिळालेला विजय हा केवळ आणि केवळ काँग्रेस विचार जपणाऱ्या सामान्य जनतेमुळे मिळाला असल्याचे मान्यवर यांनी नमूद केले
महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचे फोडाफोडीचे राजकारण अजिबात आवडलेले नाही,मोठ्या प्रमाणात वाढलेला भ्रष्टाचार आणि महागाईमुळेही राज्यातील जनता त्रस्त आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही परिवर्तन घडवण्यासाठी जनता तयार आहे. गरज फक्त एकजुटीने लढण्यासाठी सज्ज रहावे
महाराष्ट्रातील मंत्रालयावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार हे आता निश्चित झाले आहे,त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्याही प्रचंड मोठी आहे या परिस्थितीत पक्षश्रेष्ठींनी योग्य पद्धतीने जागावाटप करून कार्यकर्त्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आहे लातुर येथील हॉटेल ग्रँड येथे बैठक घेऊन निवेदन देण्यात आले
असता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकशाही मध्ये उमेदवार व उमेदवारी मागणी तो अधिकार आहे पण कॉग्रेस पक्षात जात, व धर्म च्या आधारावर दिली जाणार नाही सर्वेक्षणात ज्यांचे नाव येईल व लोकजनाधार यावर उमेदवारी दिली जाईल असे स्पष्ट करीत मागणी फेटाळली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.