औशात धुरफवारणी करुन मच्छरांपासून सुटका करावी -सय्यद मुजफ्फर अली इनामदार

औशात धुरफवारणी करुन मच्छरांपासून सुटका करावी -सय्यद मुजफ्फर अली इनामदार 


औसा प्रतिनिधी 
मच्छरकरीता धुरफवारणी व इतर आरोग्य विषयक बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी 
 एम.आय.एम.च्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. सद्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरात मच्छर ची उत्पत्ती जास्त प्रमाणात झालेली आहे त्यामुळे डेंगु सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नागरीक अत्यंत आजारी पडत आहे. तसेच स्वच्छतेच्या बाबींकडे नगर पालिका पुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. घंटगाडी चार ते पाच दिवसात येते म्हणून घरामध्ये कचरा साचुन ही नारीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरात गल्लोगल्ली कचऱ्याचे डिंग साचले आहेत.

तसेच गावात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला असून अनेकांना हे कुत्रे चावा घेत आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच शहरात बऱ्याचश्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद असून यामुळे लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. तसेच जामा मस्जीद ते जलालशाही चौक सिमेंट रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. ते खडेही बुजवण्यात
यावेत. तरी वरील सर्व बाबींकडे विशेष लक्ष देवून त्याची पुर्ता करण्यात यावी तसेच धुर फवारणी करुन मच्छरांपासुन सुटका करण्यात यावी अन्यथा एम आय एम च्या वतीने आपल्या कार्यालयासमोर मच्छमारो आंदोलन करण्यात येईल. यापुर्वीही आपणास अनेकवेळा आपणाकडे याबाबत मागणी करण्यात आलेली

नाही. याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरुपात देण्यात यावी.अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना व माहितीस्तव खासदार , जिल्हाधिकारी,व औसा पोलिस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या