श्री वेताळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी , लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक , लातूर कॉलेज ऑफ नर्सिंग, लातूर कॉलेज ऑफ सायन्स, यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान, जय जवान जय किसान चा नारा देणारे लाल बहादुर शास्त्री यांची जयंती संयुक्तपणे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे , संचालक नंदकिशोर बावगे, माधुरी बावगे, प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला,प्राचार्य डॉ. विरेंद्र मेश्राम प्राचार्य संतोष मेदगे, प्रभारी प्राचार्या क्षितिजा माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले. त्या नंतर शासनाच्या अधीनियमा नुसार महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
प्राचार्य. डॉ श्रीनिवास बुमरेला यांनी मनोगत व्यक्त करताना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आढावा घेऊन त्यात महात्मा गांधींची भूमिका स्पष्ट केली. महात्मा गांधींचे विविध सत्याग्रह आणि स्वतंत्र प्राप्ती साठी केलेले अहिंसात्मक प्रयत्न यांची माहिती दिली, व महात्मा गांधींचे विचार कशा पद्धतीने सर्वकालीन महत्त्वाचे आहेत हे सांगताना कार्याची व विचारांचे अनुकरण करन महत्त्वाचे आहे म्हणून गांधी विचार अमलात आणताना आपल्या जवळ असणाऱ्या साधन सामुग्री चा वापर करत स्वावलंबन आणि कृतीशीलता या द्वारे आर्थिक प्रगती साधावी ही महात्मा गांधींची खरी जयंती साजरी केली हे साध्य होईल असे मत व्यक्त केले. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीं आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून त्यांनी देशासाठी केलेलं त्याग आणि समर्पण हे गुण अंगिकारल्यास देश खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ शकेल असे मत प्राचार्य डॉ.विरेंद्र मेश्राम यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभागाद्वारे करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रा.अतुल कदम प्रा.सुप्रिया जाधव,प्रा.शबनम शेख,शुभम वैरागकर ,महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.