"वाचन प्रेरणा दिन "लातूर कॉलेज ऑफ फार्मसी ,लातूर मध्ये साजरा
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर या महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र शासन व संचालक तंत्रशिक्षण विभाग औरंगाबाद यांच्या आदेशानुसार महाविद्यालयांमध्ये भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या १५ ऑक्टोंबर जन्मदिनानिमित्त "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आला. त्या अंतर्गत व्याख्याने, चर्चासत्र, अभिवाचन, सामूहिक वाचन ,ग्रंथ प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर बावगे ,सचिव श्री वेताळेश्वर बावगे, संचालक श्री नंदकिशोर बावगे, माधुरी बावगे,प्राचार्य श्रीनिवास बुमरेला, प्रा अतुल कदम,प्रा माधुरी पोळकर यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
माणसाला व्यक्त होण्यासाठी भाषा लागते "पुस्तके वाचल्यानंतर मस्तक सुधारते आणि मस्तक सुधारल्यावर नंतर कुठेही नतमस्तक होण्याची गरज भासत नाही "वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून वाचन प्रेरणा आणि संस्कृती विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास हा जाणकार आणि माहिती संपन्न समाज निर्मिती, व्यक्तिमत्व विकास, साहित्यिक विकास आणि भाषा विकास यासाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी कोणते वाचन साहित्य वाचावे, वाचन कसे करावे, अवांतर वाचनाचे महत्व आदी बाबींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला प्रा मनकरना कराळे, प्रा चैतन्य पवार , प्रा मुळे सर,प्रा शबनम शेख,प्रा सुप्रिया जाधव, ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे,शुभम वैरागकर आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.