हस्ती पाईप लाईन रद्द करून लोखंडी पाईप लाईन करा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार

 हस्ती पाईप लाईन रद्द करून लोखंडी पाईप लाईन करा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार 




औसा प्रतिनिधी 

औसा शहरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हस्तीपाईप लाईन रद्द करुन लोखंडी पाईपलाईनने पाणीपुरवठा करा अशी मागणी एम आय एम च्या वतीने खासदार व आमदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .

औसा शहरातील  नगर परिषद हद्दीत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चालु असलेल्या हस्तीपाईप लाईन बसविण्याचे कामामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या पाईपलाईनच्या माध्यमातून पुरवले जाणारे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत असुरक्षित असल्याचे जाणवते. हस्तीपाईपचे जास्त प्रमाणात वापरामुळे पाण्यातील दुषितपणचा धोका वाढतो, ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो.


नगर परिषदेने विकासाच्या नावाखाली शहरातील विविध भागात या प्रकारच्या पाईपलाईनचे काम हाती घेतले आहे. मात्र, या कामासाठी वापरले जाणारे हस्तीपाईप दीर्घकाळ टिकणारे नसतात व यामुळे पाण्याचा दर्जा खालावतो. याव्यतिरिक्त, हस्तीपाईपची देखभाल करणे खर्चिक व कठीण असते, ज्यामुळे भविष्यात आणखी समस्या उद्भवू शकतात.


तरी आम्ही एम आय एम औसा च्या वतीने नगर परिषदेस सविनय विनंती आहे की, हस्तीपाईप लाईन बसविण्याऐवजी लोखंडी (बीड) पाईपलाईन बसविण्याची प्रक्रिया राबवावी. लोखंडी पाईपलाईनच्या वापरामुळे पाणी स्वच्छ, सुरक्षित आणि शुध्द राहील. तसेच लोखंडी (बीड) पाईपलाईन जास्त काळ टिकाऊ असल्यामुळे त्याची देखभाल करणे सोपे व कमी खर्चिक हाईल.


तरी औसा शहरात होत असलेली नविन पाईपलाईन हस्ती पाईपची न करता लोखंडी करण्यात यावी अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आ.अभिमन्यू पवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या