औशात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा -सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची मागणी..
औसा प्रतिनिधी
औसा शहरात व परिसरात कुत्र्यांची होत असलेले वाढ ही शहरातल्या नागरीकांसाठी खुप मोठी समस्या झाली आहे. मोकाट कुत्र्यांपासुन लहान मुलांना जिवीतास धोका निर्माण झाला आहे व रात्री उशीरा जर बाहेर पडायचे असेल तर मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड अंगावर येत आहेत व चावा घेत आहेत. याबाबत आम्ही दि. १८/०६/२०२२ व वेळोवेळी निवेदन दिलेले होते तसेच याबाबत मा. खा. ओमराजे निंबाळकर यांनी पत्राद्वारे आपणास सुचित केले होते. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. व जाणून बुजुन दुर्लक्ष करण्यात येत आहे. ग्रामिण रुग्णालयामध्ये दररोज दोन ते तीन नागरीक उपचार घेण्यासाठी जात आहेत. पिसाळलेले कुत्रे शहरात मोकाट फिरत आहेत.
तरी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा एम.आय.एम. च्या वतीने नगर पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल ह्याची आपण नोंद घ्यावी.अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी एम आय एम चे अजहर कुरेशी, इस्माईल बागवान, अलीम शेख,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.