श्री वेताळेश्वर शिक्षण संकुलात संविधान दिन उत्साहात साजरा.

 श्री वेताळेश्वर शिक्षण  संकुलात संविधान दिन उत्साहात साजरा.






श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,  राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी , लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर कॉलेज ऑफ नर्सिंग (जी एन एम) लातूर कॉलेज ऑफ आयटीआय यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव  वर्षानिमित्त संविधानाच्या मूल्याची जनजागृती व्हावी यासाठी हर घर संविधान अभियान मोहीम राबविण्यात आलेले आहे. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटने बाबत जागरूकता महाविद्यालय विद्यार्थी तसेच देशाची भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील महाविद्यालय शैक्षणिक संकुले यामध्ये जनजागृती केली आहे. तसेच महाविद्यालयात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली आहे.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचालक नंदकिशोर बावगे, सौ माधुरी  बावगे,प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला,प्राचार्य डॉ.वीरेंद्र मेश्राम ,प्राचार्य संतोष मेदगे, प्राचार्या सौ योगिता बावगे, क्षितिजा माळी , प्रा.माधुरी पोळकर,प्रा.शुभम वैरागकर, ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून संविधानाचे वाचन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या