*औसा येथे पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतूर वादन सोहळा*
औसा प्रतिनिधी- समर्थ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या 25 व्या पुण्यतिथी जागतिक कीर्तीचे संतूर वादक पद्मश्री पंडित श्री सतीशजी व्यास यांच्या संतूर वादनाचा कार्यक्रम समर्थ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या 25व्या पुण्यस्मरणा निमित्त त्यांचे समाधी मंदिरात श्री क्षेत्र गोपाळपूर मध्ये शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी आयोजित असून शास्त्रीय गायन संगीत क्षेत्रातील जाणकार रसिक स्रोत्यांनी तसेच नाथ भक्तांनी या संगीत,गायन श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह भ प श्री ज्ञानराज गुरुबाबा महाराज औसेकर यांनी केले आहे.
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या वार्षिक पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने गेल्या तीन वर्षापासून श्रीक्षेत्र गोपाळपूर औसा येथे भारतीय अभिजात संगीत गायन क्षेत्रातील जगविख्यात कलाकारांची कला सेवा दरबार स्वरूपात आयोजली जाते व शास्त्रीय संगीत गायन आणि सुमधुर भक्ती गीत संगीताची मेजवानी रसिक श्रोत्यांना मिळते आहे.
यावर्षी शनिवार दिनांक 14 डिसेंबर रोजी श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या समाधी मंदिरात सायंकाळी ४ ते ७ या वेळेत या शास्त्रीय संगीताचा सेवा दरबार सोहळा संपन्न होत आहे.
नाथ संस्थानचे पाचवे पिठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या अधिपत्यात आणि सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनात यावर्षी 25 व्या पुण्यतिथी सोहळ्यात संतूर गायन व शास्त्रीय गायनाची मैफल रंगणार आहे
या सेवा दरबार संगीत मैफिलीत पंडित मुकुंदराज देव व चिरंजीव प्रसाद कुलकर्णी यांचे तबला वादन साथ तर श्री शारंग बेलुबी यांचे संवादिनी हार्मोनियम संगती लाभणार आहे. विशेष म्हणजे या सेवा दरबारात श्री आनंद बेंद्रे व ह भ प श्री ज्ञानराज गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या शास्त्रीय गायनाची सेवा संपन्न होणार आहे. या अनोख्या व श्रवणीय असलेल्या संतूर वादन, शास्त्रीय गायन, संगीत श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ह भ प श्री ज्ञानराज महाराज औसेकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.