मोकाट कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करुन कुत्र्या च्या हलल्यात जख़्मी चिमुकलीवर होत असलेला सर्व खर्च पालिका प्रशासनाच्या यतीने करण्यात यावा
औसा (प्रतिनिधी )
एम.आय.एम.च्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे एका चिमुकल्या मुलीवर कुत्र्यांचा जिवघेणा हल्ला झाले आहे
सविस्तर वृत असे की एम.आय.एम. च्या वतीने निवेदन करतो की, औसा शहरात व परिसरात कुत्र्यांची होत असलेले वाढ ही शहरातल्या नागरीकांसाठी खुप मोठी समस्या झाली आहे. याबाबत दि. २९/११/२०२४ व व पुर्वी अनेकवेळा मोकाट कुत्र्यांचा बंदोवस्त करण्याबाबत आपणास कळविण्यात आले होते तसेच जेंव्हा जेंव्हा कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना झाली त्यावेळे पालीकेला कळविण्यात आलेले होते. परंतु पालीकेने यावर कोणतही कार्यवाही केलेली नाही.
पालीकेला दिलेले निवेदन ताजे असतानाचा अवघ्या आठ दिवसात कुत्र्यांनी चावा घेतलेल्या चार ते पाच घटना घडल्या. त्यात अत्यंत गंभीर घटना म्हणजे अदांजे तीन वर्षाची चिमकुमली मुलगी नामे आयत कुरेशी या चिमुकल्या मुलीवर कुत्र्यांनी जिवघेणा हल्ला करील गळा, डोळा आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्या आहेत. तसेच इतर तीन ते चार लोकांनाही कुत्र्यांनी हल्ला केलेला आहे.
या सर्व घटनांची नगर पालिका प्रशासन जबाबदार आहे. वरील मुलीच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे, त्यांना सदरचा खर्च करणे अश्यक्य आहे. तरी गावतील मोकाट कुत्र्यांचा त्वरीते बंदोबस्त करुन सदरील चिमुकलीवर होत असलेला सर्व खर्च पालिका प्रशासनाच्या यतीने करण्यात यावा निवेदनावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी अन्यथा नागरीकांची व जनतेची प्रश्नाची सोडवणूक न करणाऱ्या निष्क्रिय पालीका प्रशासनाचा नागरीकांच्या व एम.आय.एमच्या वतीने टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल असे पत्र मुख्याधिकारी नगर परिषद, औसा याना सय्यद मुजफ्फरअली इनामदार, एम.आय. एम. प्रमुख, औसा.
यांनी दिला आहे माहितीस्तव पोलीस निरीक्षक पो.स्टे. औसायाना हि कळविलेआहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.