राज्यातील अल्पसंख्यांक कल्याणकारी योजना ची अंमलबजावणी करा
औसा :एम.आय.एम.च्या व अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने मुख्यमंत्री कडे मागणी करण्यात आली की, राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या हितासाठी अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी २००९ मध्ये करण्यात आली. त्याच बरोबर मागच्या सरकारने बरेचश्या योजना लागु केल्या व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत, शैक्षणिक व्यवसायिक कर्ज वाटप करण्यात आले. परंतु मागील ९ वर्षापासुन अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणकारी योजनेचा कसल्याही प्रकारची अंमलबजावणी दिसून येत नाही. व महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाला ज्या हेतुने मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची शैक्षणिक, व्यवसायीक थेट कर्ज अनेक अशा योजना राबविण्यात येत नाहीत. व त्यात अल्पसंख्यांक आयोग जिल्हा व तालुका स्तरीय अल्पसंख्यांक समिती व प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनेचा कार्यालय असून त्या ठिकाणाहुन कसल्याही प्रकारचा अल्पसंख्यांक कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही.
देशाचे पंतप्रधान यांच्या सबका साथ सबका विकास या घोषणा प्रमाणे अल्पसंख्यांक समाजाच्या मुस्लिम, शिख, बौध्द, जैन इत्यादी समाजाचा विकास करण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घ्यावेत ही विनंती. यापुर्वी अनेकवेळा मागणी करुनही शासन दुर्लक्ष करीत आहे.मुख्यमंत्री ने योजना कराव्यात अन्यथा अल्पसंख्यांक समाजाला आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर येवून घटनेच्या अधिन राहून राज्यभर आंदोलन करावे लागेल असे पत्र
सय्यद मुजफ्फरअली इनामदार,एम.आय.एम. प्रमुख, औसा.यांनी मुख्यमंत्री कडे तहसीलदार-औसा मार्फत दिले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.