अल्पसंख्यांकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी धरणे आंदोलन ः शैक्षणिक, सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे

 अल्पसंख्यांकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात

अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी धरणे आंदोलन ः शैक्षणिक, सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे




लातूर ( प्रतिनिधी) शहरातील महात्मा गांधी चौक येथे अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात अल्पसंख्यांक हक्क दिनी युथ मुव्हमेंट ऑफ महाराष्ट्र शाखा लातूरच्या वतीने धरणे आंदोलनाचे करण्यात आले होते. यावेळी शहरातील अल्पसंख्यांक समाजातील सर्व घटकांनी उपस्थिती लावून राज्य शासनाचे लक्ष वेधले. तसेच जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदनही पाठविण्यात आले. 

आंदोलनात युथ मुव्हमेंटचे प्रदेशाध्यक्ष रफिक शेख, शहराध्यक्ष अहेमद हाश्मी, स्वामुविपचे मोहसीन खान, एम.आय.शेख, काँग्रेसचे फैसल कायमखानी, डॉ. असद पठाण, खदीर खान, अजहर शेख आदींसह शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीचे तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे शासनाचे धोरण आहे परंतू अंमलबजावणी नाममात्र होत आहे.1.अल्पसंख्यांक विकास विभाग व त्याशी संलग्न संस्था मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, वक्फ बोर्ड, उर्दू अकॅडमी, अल्पसंख्यांक आयोग, अल्पसंख्यांक संशोधन प्रशिक्षण संस्था व आयुक्तालय यांना शासनाद्वारे दरवर्षी आर्थिक तरतूद कमी करण्यात येत आहे ती चिंतेची बाब असून त्यात वृध्दी व्हावी तसेच संबंधित कार्यालयात कर्मचार्‍यांची रिक्त पदे त्वरित भरावीत.

2) महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्यांक योजनां व पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमावर व सच्चर समितीच्या मंजूर शिफारशींवर अंमलबजावणीची आकडेवारी जाहिर करण्यात यावी व परिणामकारक अंमलबजावणी करून न्याय व हक्क वेळेत मिळेल अशी व्यवस्था करावी. 3) शासन निर्णय दि. 15/04/2017 च्या सुचनेप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्हयात अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना करून नियमित बैठकांचे आयोजन करण्यात यावे. तसेच समितीमध्ये अशास्कीय सदस्यांची रिक्त पदे त्वरित भरावीत.

4) महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हयात अल्पसंख्यांक समाजाच्या मुला व मुलींसाठी वस्तीगृह इमारत तसेच उर्दू घर (शैक्षणिक संकूल) उभारण्यात यावीत. 5) दप्तर दिरंगाई कायदा व लोकसेवा अधिनियम च्या तरतुदी अन्वये अल्पसंख्यांक योजनांवर अंमलबजावणीचे नियोजन करून संबंधीतांवर जबाबदारी निश्‍चित करावी. 6) महाराष्ट्र राज्यात सामाजिक सलोखा व सद्भावना अबाधित रहावी यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत. 7) देशात आणि राज्यात सद्या अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात अत्यंत अपमानजनक आणि भडकाऊ द्वेषपूर्ण भाषणांची मालिका सुरू आहे. ज्यामुळे सामाजिक शांती आणि सौहार्दावर गंभीर परिणाम होत आहे. द्वेषपूर्ण भाषणे करणार्‍यांवर कडक कार्यवाही करून त्यांना प्रतिबंधीत करावे. 8) प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट 1991 नुसार देशातील प्रत्येक धार्मिक स्थळांची 15 ऑगस्ट 1947 रोजीची स्थिती बदलली जाऊ शकत नाही. या मध्ये बदल केल्यास सामाजिक सौहार्दाला हानी पोहोचेल. म्हणून त्यावर सक्तीने अंमलबजावणी व्हावी, यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. 

आंदोलनात शेख शकील, सुलतान शेख, नदीफ शेख, मुजीब शेख, लक्ष्मण कांबले,  कैलास कांबले. किरण जाधव, अमीन पठाण, अजहर शेख, लतीफ पठाण, मोहसीन मनियार, इरफान शेख , शेरखान पठाण यांच्या समवेत शहरातील शेकडो नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या