*राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते लातूर पोलीस दलाच्या वतीने आयोजित प्रदर्शनीचे उद्घाटन.*
लातूर : पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त लातूरच्या क्रीडा संकुलात पोलिस दलाच्या वतीने भव्य प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये जिल्हा पोलिस दलातील वेगवेगळ्या विभागाचे स्टॉल लावण्यात आले असून सदर प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते पार पडले. सदरचे प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहलीच्या रूपाने क्रीडा संकुलात प्रदर्शन पाहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना पोलिस दलाच्या कामकाजाची ओळख होत आहे.
सायबर सेल, भरोसा सेल, मानव तस्करी विरोधी पथक, बॉम्बशोधक पथक, शस्त्र विभाग, क्राईम ब्रँच, इन्वेस्टिगेशन व्हॅन, डॉग स्कॉड, वाहतूक सुरक्षा, वायरलेस यंत्रणा, सुरक्षा हेल्पलाइन अशा विविध विभागाच्या माहितीचे आणि शस्त्राचे प्रदर्शन पोलिस स्थापना दिनाच्या (रेझिंग डे) निमित्ताने भरविण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे विजया रहाटकर यांना पोलिस दलाच्या वेगवेगळ्या विभागाची माहिती दिली.
*विद्यार्थ्यांनी अन् नागरिकांनी पोलिस दलाचे कामकाज जाणून घ्यावे.*
जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू पोलिस दलाचे प्रदर्शन सुरू असून याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सर्वच विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी प्रदर्शन पाहून पोलिस दलाच्या कामकाजाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला....
लातूर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना पोलिस दलाचे प्रदर्शन दाखविले जात आहे. दोन दिवस चालणारा प्रदर्शन पाहण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. बहुतांश सर्वच शाळांचे विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. जणू विद्यार्थ्यांच्या सहलीचं प्रदर्शन पाहण्यासाठी शाळांकडून आयोजित केल्या जात आहेत,असे चित्र क्रीडा संकुलात पाहायला मिळत आहे.
पोलीस प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी लातूर शहर व जिल्ह्यातील विविध शाळेतील जवळपास 8 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी भेट दिली असून उद्या प्रदर्शनाचा दुसरा व शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सदर प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरीक व विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे आव्हान लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.