क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत उत्साहात साजरी

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत उत्साहात साजरी




औसा (प्रतिनिधी )

   भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीसुर्य ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात साजरी करण्यात आली . सावित्रीबाई फुले यांच्या  प्रतिमेस पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे ,संचालक नंदकिशोर बावगे, सौ माधुरी बावगे,प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला , प्राचार्या योगिता बावगे,  प्राचार्य संतोष मेदगे, प्रा. अतुल कदम ,प्रा.राजशेखर चौधरी, प्रा. माधुरी पोळकर प्रा. शुभम वैरागकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून विनम्र अभिवादन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या