*बांधकाम कामगारांचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांचे कामगार संघटना संयुक्त संघटनेस आश्वासन.
मुंबई (प्रतिनिधी )
महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनासंदर्भात बोलताना कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी आश्वासन दिले की बांधकाम कामगारांचे पोर्टल पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल. बांधकाम कामगारांचे कामकाज करण्यासाठी कामगार संघटनांना अधिकार देण्याबाबतचे राज्य शासन ठरवीत असून त्याबाबतही लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
कॉ शंकर पुजारी यांनी बैठकीमध्ये अशीही मागणी केली की माजी कामगार मंत्र्यांनी बांधकाम कामगारांना 5000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता. माजी कामगार मंत्री हे पूर्वीचे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष होते. त्यामूळे तो मंडळाचा निर्णय अमलात आणून राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबद्दल निर्णय करावा.
तसेच इतर सर्व मागण्यांच्या संदर्भात लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल असेही श्री आकाश फुंडकर यांनी महाराष्ट्रातून आलेल्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले. शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्रातील किमान वीस जिल्ह्यातून 42 कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.