परीक्षेच्या निकाला दिवशी रडायचं नसेल तर वर्षभर अभ्यास करा- लेखक विवेक सौताडेकर
लातूर
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत लेखक व विद्यार्थी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे, जिल्हा समन्वयक, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, लातूर व प्रमुख मार्गदर्शक लेखक विवेक सौताडेकर, प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला, प्राचार्य डॉ वीरेंद्र मेश्राम, प्राचार्य योगिता बावगे, प्राचार्य संतोष मेदगे, प्राचार्य रूपाली गिरी, सुमित बोरसुरे व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचन पंधरवाडा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने राबविला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त साहित्य, वाङ्मय इत्यादी लेखन साहित्याचे वाचन करावे असे प्रस्ताविक मनोगत प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांनी व्यक्त केले.
प्रत्येक व्यक्तीने आपले मत चांगल्या व प्रभावी पद्धतीने सादर करावे तेव्हाच माणूस यशस्वी होतो असे मनोगत सचिव वेताळेश्वर बावगे यांनी व्यक्त केले.
"परीक्षेच्या निकाला दिवशी रडायचं नसेल तर वर्षभर अभ्यास करा आणि अशी स्वप्न पहा जी स्वप्न तुम्हाला झोपू देत नाहीत" असे मत प्रमुख मार्गदर्शक व लेखक विवेक सौताडेकर यांनी व्यक्त केले. संवाद व सुसंवादाबद्दल प्रमुख पाहुण्यांनी सखोल असे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचालक नंदकिशोर बावगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. माधुरी पोळकर, एनएसएस विभाग प्रमुख प्रा मुंजाजी मुळे, प्रा शुभम वैरागकर, ग्रंथपाल ज्ञानेश्वर कांबळे, प्रा पवार सर, प्रा अक्षता लासुरे, प्रा स्नेहजा भालेराव, प्रा मनकरणा कराळे, प्रा क्षितिजा माळी, प्रा. संस्कृती शिरुरे, रोहिणी सोमवंशी, ऋतुजा कोरे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुप्रिया जाधव तर आभारप्रदर्शन प्रा अतुल कदम यांनी केले.
हिवाळा धमाका ऑफर
अता मिळवा फक्त
₹ 24999
🔶 बेड
🔷उशी गादी
🔶कपाट
🔷दुल्हन सेट
🔶2 ख़ूर्ची
पत्ता :जी एम इलेक्ट्रिनिक & फर्नीचर, लातूर रोड CNG पेट्रोल पंप च्या पुढे, अलंदकर विट भट्टी समोर, औसा
संपर्क 8956515155
. 9175978989
. 9175086000
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.