औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी काॅम्प्युटर पार्कवर पत्रकार दिन उत्साहात साजरा

 औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी काॅम्प्युटर पार्कवर पत्रकार दिन उत्साहात साजरा












औसा तालुका पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी काॅम्प्युटर पार्कवर पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रंगकर्मी उदगीर कडून दैनिक सकाळ चे पुरस्कार प्राप्त पत्रकार विजयकुमार बोरफळे व इंजिनिअरींग चे शिक्षण घेणारे पत्रकार रमेश शिंदे यांचे चिरंजीव रणजित रमेश शिंदे यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला.

     पत्रकार दिनानिमित्त सर्वच उपस्थित पत्रकारांचा नवीन वर्षाची दिनदर्शिका व पुष्पगुच्छ देऊन प्रा. काशिनाथ सगरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, बालाजी उबाळे,राम कांबळे,इलियास चौधरी, गिरीधर जंगाले,विवेक देशपांडे, रमेश दुरूगकर, अजित मुसांडे, बालाजी शिंदे, विठ्ठल पांचाळ, विनायक मोरे, एस ए काझी,मजहर पटेल, संभाजी शिंदे नजीर सर,पाशा शेख, रमेश शिंदे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कांबळे यांनी केले तर बालाजी उबाळे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या