रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक. 68 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व वाहनासह 03 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.*


*रस्त्याने एकट्या जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक. 68 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व वाहनासह 03 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

           लातूर (प्रतिनिधी ) मंगळसूत्र, गंठण, चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली  मोटार सायकलसह एकूण 03 लाख 23 हजार  रुपयांचा 68 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त. 03 गुन्हे उघड. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.




              याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी/अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते.

          दरम्यान 31/01/2025  पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चेन स्नॅचिंग करून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला औसा रोड वरील एका पेट्रोलपंप समोरून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव


1) राजू सहदेव जाधव वय 22 वर्ष राहणार याकतपूर तालुका औसा जिल्हा लातूर.


               असे असल्याचे सांगितले. नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो मागील काही महिन्यापासून लातूर शहरातील  विविध ठिकाणाहून रस्त्या वरून एकटी/ पायी जाणारे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण  हिसका मारून,चोरून मोटार सायकल वरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

             त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे शिवाजी नगर,  येथे मंगळसूत्र चोरीचे 03 गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले.


             नमूद आरोपीने वर नमूद 03 गुन्ह्यातील चोरलेला सोन्याचा 68 ग्रॅम वजनाचे 03 मंगळसूत्रे, गंठण काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्यातील दागिने व मोटार सायकल असा एकूण 3,23,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

              काही दिवसातच तीन चेन स्नॅचिंग झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.  स्थानिक गुन्हे शाखेने उत्कृष्टरित्या तपास करीत चैन करणाऱ्या आरोपीला जेरबंद केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

                सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले,यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, अर्जुन राजपूत, दीनानाथ देवकते, युवराज गिरी, मोहन सुरवसे, राजेश कंचे, विनोद चलवाड तसेच पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस अंमलदार बालाजी कोतवाड, सोनवणे यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या