विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी चक्रधर शाळेत शैक्षणिक परिसंवाद संपन्न..
औसा : - विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी औसा येथील चक्रधर शाळेत शैक्षणिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक परिसंवाद कार्यक्रमास विशेष निमंत्रित प्रतिनिधी, मान्यवर, पालक, विद्यार्थीनीसह, विद्यार्थ्यांनी आपलीं हाजेरी लावली होती. या शैक्षणिक परिसंवाद सत्राच्या कार्यक्रमास शहरातील प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी, पोलिस प्रशासन, सामाजिक संस्था, आरोग्य विभाग, विधीज्ञ च्या माध्यमातून सध्याच्या परिस्थितीवर परिसंवादाबरोबर मार्गदर्शन करत अडीअडचणी, समस्या समजून घेत समस्यांचे निराकरण करण्यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद बोंडले, रे - आफ होप फाउंडेशनचे अध्यक्ष अमर खानापुर, यांची उपस्थिती होती.
शहरातील चक्रधर प्राथमिक व माध्यमिक शाळेत दि. २९ जानेवारी २०२५ बुधवार रोजी सकाळी ११ : ०० वाजता शाळेत पालक व विद्यार्थ्यासाठी "शैक्षणिक परिसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. यात सामाजिक व राजकीय प्रतिनिधी म्हणून पालक व विद्यार्थी यांच्या सोबत संवाद साधला, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शाळेचे मुख्याध्यापक सुलतान शेख यांनी अतिशय नाविन्यपूर्ण व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी पालकांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल या चर्चासत्राच्या निमित्ताने घडवून आणली. या चर्चा सत्रामध्ये कायद्याविषयी चर्चा करण्यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बोंडले, आरोग्याचे डॉ. चांद पटेल, रे आफ होप फाउंडेशनचे अध्यक्ष अमर खानापुरे, शिक्षक प्रतिनिधी आंदुरे प्रशांत, पालक प्रतिनिधी राजाराम सुर्यवंशी, विद्यार्थीनी प्रतिनिधी तन्वी सचिन कांबळे, यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पालकांची प्रतिनिधी, विद्यार्थ्यांची प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी ही या चर्चासत्रामध्ये उपस्थित होते. खऱ्या अर्थाने आज वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये अशा पद्धतीची चर्चासत्र हे प्रत्येक शाळेत आयोजित केले गेले पाहिजेत असा निर्धार व्यक्त करण्यात आला. याचा सर्व विद्यार्थी व पालक यांना त्यांच्या भावी वाटचालीत मदत होईल. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख एस एस, शेख एम एस यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.