पत्रकार म.मुस्लीम कबीर यांना इब्राहिमसाब सरगुरू जीवन गौरव पुरस्कार आणि सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांना राहत खिदमत-ए-खल्क पुरस्कार जाहीर
औसा (प्रतिनिधी) औसा शहरातील अरबी भाषेचे अभ्यासक,मौलवी व विचारवंत दिवंगत इब्राहिम साब जुल्फेकार अली सरगुरु यांच्या स्मरणार्थ व महेताबसाब अजमोदिन पटवारी एज्युकेशन ॲण्ड वेलफेअर सोसायटीच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार व राहत खिदमत-ए-खल्क पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यापूर्वी खिदमत-ए-खल्क पुरस्कार सय्यद हबीब व शेख बासीद यांना तसेच जीवन गौरव पुरस्कार दिवंगत मौलवी हबीबोद्दीन पटेल,सेवानिवृत्त शिक्षक दिवंगत मौलवी शेख करीमसाब आणि गेल्या वर्षी सामाजिक,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे अलहाज हिमायत पटेल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार,उर्दू,मराठी आणि हिंदी पत्रकारितेत अग्रेसर,ज्येष्ठ पत्रकार म.मुस्लिम कबीर व सामाजिक क्षेत्रात नेहमी कार्यरत,समाज सेवक सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांना राहत खिदमत-ए-खल्क पुरस्कार दि.१२ फेब्रुवारी २०२५ रोजी हाश्मी फंक्शन हॉल औसा येथे ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे महेताबसाब अजमोदिन पटवारी एज्युकेशन ॲण्ड वेलफेअर सोसायटीचे सचिव ॲड.इक्बाल शेख यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.