आरंभ प्री- प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा*

 *आरंभ प्री- प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा* 





औसा प्रतिनिधी :-औसा येथील शिवप्रयाग बहुउद्देशीय मंडळ द्वारा संचलित आरंभ प्री- प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास ह भ प दत्तात्रयजी पवार गुरुजी माजी मुख्याध्यापक औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, औसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव जाधव, दादा कोपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला. ह भ प दत्तात्रेय गुरुजी यांच्या हस्ते लहान बालकांना गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ह भ प दत्तात्रय पवार गुरुजी, श्री काशिनाथ सगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शिवलिंगप्पा सिंदूरे, संस्थेचे सचिव वैजनाथ सिंदुरे मुख्याध्यापिका शितल वैजनाथ सिंदुरे. अमर उपासे. वीरभद्र कोथळे जगदीश स्वामी ,अमर मनगिळे, वार्षिक स्नेहसंमेलना निमित्य विद्यार्थ्यांनी लोकगीत देवी देवतांचे गीते तसेच देशभक्तीवरील गीत उत्कृष्ट 

सादरीकरण केली त्यामुळे रसिक प्रेक्षकांची मने जिंकली, स्नेहसंमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर पालक विद्यार्थी शिक्षक पत्रकार व्यापारी, उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील शिक्षक  कर्मचारी यांनी परिश्रम घेतला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या