*इख्लास रमजान अंकाचे पुणे येथे थाटात प्रकाशन संपन्न व कविसंमेलन रंगले*
इख्लास रमजान अंकाद्वारे सामाजिक सलोखा व भाईचारा राखण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे.-मा. सलीम खिलजी
दिनांक १० मे २०२5 रोजी रमजान विशेष अंक इख्लासचे प्रकाशन संपन्न झाले. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेद्वारे प्रकाशीत हा दुसरा अंक आहे. या अंकाचे संपादक अनिसा सिकंदर शेख , उपसंपादक खाजाभाई बागवान, कार्यकारी संपादक मंडळ सदस्य तहेसीन सय्यद, समैय्या चौधरी , निलोफर फणीबंद, नसीम जमादार , प्रकाशक इंतेखाब फराश यांच्या प्रयत्नातून साकार झाले.
इख्लास रमजान अंकाचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक व संपादक आदर्श मुस्लिम व मीडिया नेटवर्क राजस्थान मा. सलीम खिलजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले तर कवीसंमेलन मा. गझलकार मसूद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे सचिवा अनिसा सिकंदर,संस्थेचे उपाध्यक्ष इख़्लास अंकाचे सहसंपादक खाजाभाई बागवान, डॉ.प्रा. गझलकार सतीश देवपूरकर,मा. गझलकार मसूद पटेल, पुणे जिल्हा अध्यक्ष बा .ह मगदूम,सचिव मेहमूदा शेख, कवयित्री मिनाज शेख,सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष व पानगलच्या प्राचार्य डॉ. सुरैय्या जहागीरदार, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व बालसाहित्यिका नसीम जमादार, मा. गझलकारा निलोफर फणीबंद ,कवी राहुल भोसले इ. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात कुराणच्या आयत पठनाने इंग्रजी लेखक सलीम शेख यांनी केले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत रमजान चे महत्व व विविधतेतून एकता या विषयावर आपापली मते व्यक्त करुन भाईचारा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या अंक निर्मिती करणाऱ्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या.सलीम खिलजी व संपादिका अनिसा सिकंदर यांनी आपल्या मनोगतात आजची सामाजिक परिस्थितीवर व समाजात दूषित झालेल्या वातावरणावर भाष्य केले. त्यांची आपल्या मनोगतात म्हटले की अशा अंकाची आज समाजाला गरज आहे. त्यावर विचार मंथन होईल. समाजातील बांधिलकी वाढण्यास मदत होईल. ह्या अंकात रमजान विषयी सखोल माहिती देण्यात आली आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.सोशल कॉलेजचे प्राचार्य इ. जा. तांबोळी, कासिदचे संपादक अय्युब नल्लामंदू, संस्थेचे संस्थापक शेख शफी बोल्डेकर व सहसंपादिका तेहसीन सय्यद यांच्या ह्या कार्यक्रमासाठी शब्द रुपी विशेष शुभेच्छा लाभल्या आहेत.मुख्य कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. नसीम जमादार व मा. गझलकारा निलोफर फणीबंद यांनी केले. तर आभार प्रदर्शन चेरी स्कूलचे मुख्याध्यापिका परविन फराश यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.