औसा शहरातील तकीया कब्रस्तान मधील अतिक्रमण काढा...
एडवोकेट गफूरुल्लाह हाशमी यांची वक्फ बोर्ड कडे तक्रार..
औसा प्रतिनिधी औसा येथील पटेल गल्ली (पाटील गल्ली) येथे वक्फ नोंदणीकृत मुस्लिम समाजाची कब्रस्तान असून त्याचे वक्फ राज्यपत्रामध्ये तकीया कब्रस्तान प्रमाणे नोंद असून ज्याचे क्षेत्र वक्फ राज्यपत्र नोंदणीप्रमाणे 195×74 इतके असून सदर कब्रस्तानाची नोंद भ्भुमी अभिलेख कार्यालय येथे असून भुमी अभिलेख कार्यालयाच्या रेकॉर्डप्रमाणे सदर कब्रस्तानाचे भुमापन क्र. 1363 असून शिट क्र. 17 आहे. तसेच सदर कब्रस्तानाचे भुमी अभिलेख रेकॉर्डप्रमाणे 1784.90 चौ.मी क्षेत्र असून सदर कब्रस्तानाचे व्यवस्थापक म्हणून अर्जदाराचे वडिल मयत मजहरउल्ल खैरातअली हाशमी यांचे नाव आहे. सदर कब्रस्तानामध्ये मुस्लिम समाज हे आपले अंत्यविधी करतात तसेच सदर कब्रस्तान हे आज सधपरिस्थीतीमध्ये मुस्लिम समाजाचे अंत्यविधीसाठी चालु आहे. पण कांही वर्षापासुन सदर कब्रस्तानाला बंधीस्त भिंत नसल्यामुळे कांही सदर कब्रस्तानाचे जवळचे शेजारी व इतर लोकांनी बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करून कब्रस्तानाच्या जमीनीवर अनाधिकृतपणे बांधकाम केले आहे. तसेच गडाची पार्किंग करीत आहेत.व मुस्लिम समाजाच्या प्रेतांची अंत्यविधी करणेसाठी रोखठोक व अडथळा करीत आहे. मागिल कांही दिवसापासुन येथील शेजाऱ्यांनी
यांनी बेकायदेशीर रित्या सदर कब्रस्तानाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करीत आहे. तरी साहेबांनी सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून औसा शहरातील वक्फ नोंदणीकृत तकीया कब्रस्तान वरील अतिक्रमण काढून सदर जागा मोकडी करून मुस्लिम समाजाना देण्याची कृपा करावी. अशा प्रकारची तक्रार औसा येथील अँड गफुरुल्ला मजहरऊल्ला हाशमी यांनी वक्फ बोर्ड लातूर येथे केली आहे.
हाश्मी यांच्या पत्राची दखल...
औसा शहरातील एडवोकेट गफूरुल्लाह हाशमी यांनी शहरातील पटेल गल्ली (पाटील गल्ली) येथे वक्फ नोंदणीकृत मुस्लिम समाजाची तकीया कब्रस्तान मध्ये तेथील काही शेजारी यांनी केलेल्या अतिक्रमण व तसेच काही जना कडून अवैध बांधकाम सुरू केल्ल्यांची तक्रार वक्फ जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या पत्राची दखल घेत वक्फ अधिकारी यांनी तात्काळ बांधकाम थांबण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर, तहसीलदार तहसील कार्यालय औसा, मुख्याधिकारी नगर परिषद औसा,पोलीस निरीक्षक पोलिस स्टेशन औसा यांना पत्र पाठवून सदरील अवैध बांधकाम थांबण्यात यावे असे पत्र वक्फ बोर्ड अधिकारी यांनी काढले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.