लातूर जिल्हा व औसा तालुका स्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समिती गठीत करा
मौ. आझाद आर्थिक विकास महामंडळाचे शैक्षणिक व व्यवसायीक कर्ज मंजुरी-वाटप बंद असून ते तात्काळ पुर्ववत सुरु करुन त्वरीत वितरीत करण्यात यावेत.शिवेंद्रराजे भोसले , पालकमंत्री लातूर जिल्हा.यांच्या कडे एम आय एम ची मागणी
औसा एम.आय.एम. च्या वतीने आज 1 मे रोजी शिवेंद्रराजे भोसले , पालकमंत्री लातूर जिल्हा याना विविध मांगण्याचे निवेदन देण्यात आले ज्या मध्ये अल्पसंख्यांक समाज अद्याप मागसलेपणामुळे विकासापासुन दुर आहे. समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहंचत नसल्याने विकासाच्या योजना पासुन समाजाला वंचित ठेवण्यात येत आहे. ज्यामुळे मुस्लिम समाज सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास पडत चाललेला आहे.
अल्पसंख्यांक सर्वागिण विकासाकरिता उपायोजनांची अंमलबजावणी त्वरीत करावी
१. विधानसाभा निवडणुका होऊन जवळपास ५ महिनेचा कालावधी संपलेला असून कोणत्याही शासकिय कमीट्या नियुक्त करण्यात आलेल्या नाहीत ते लवकरात लवकर गठीत करण्यात याव्यात तसेच प्रत्येक कमीटीमध्ये विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींना संधी देण्यात यावी.
१. लातूर जिल्हा तसेच औसा तालुका स्तरीय अल्पसंख्यांक आयोगाचे गठण त्वरीत करण्यात यावे. तसेच जिल्हानिहाय व तालुकानिहाय स्वतंत्र अल्पसंख्यांक समितीची गठीत करण्याचे आदेश त्वरीत देण्यात यावेत.
२. वेळोवेळी अल्पसंख्यांक विभागासाठी शासनांनी प्रस्तावित केलेल्या योजना व माहिती त्या-त्या विभागाने तात्काळ तालुकास्तरीय/जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवून समितीमार्फत प्रसिध्द व अंमलबजावणी करावी.
३. अल्पसंख्यांक बहुल शहर यांना मागील पाच वर्षापासुन अल्पसंख्यांक निधी देण्यात येत नसुन ते त्वरीत मंजुर करुन वाटप करण्याचे आदेश देण्यात यावे.
४. मौ. आझाद आर्थिक विकास महामंडळाचे शैक्षणिक व व्यवसायीक कर्ज मंजुरी-वाटप बंद असून ते तात्काळ पुर्ववत सुरु करुन त्वरीत वितरीत करण्यात यावेत.
५. लातूर जिल्ह्यासह औसा तालुक्यातील ब-याच लोकांचे मौलाना आझाद महामंडळाचे कर्ज प्रस्ताव प्रलंचीत असून संबंधीत कर्जदारांचे मालमत्तेवर बोजा चढवण्यात आलेला आहे परंतु कर्ज वाटप करण्यात येत नाही.अश्या मागन्या चे निवेदन देण्यात आले ज्या वर सय्यद मुजफ्फराली इनामदार, एम.आय.एम. प्रमुख, औसा. अजहर कुरेशी,शेख नय्युमशेख अलीम,शेख गुशिर आदि च्या स्वक्षर्या आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.