*गावठी पिस्टल बाळगणारे नांदेड येथील चार जण ताब्यात. 08 जुलै रोजी पहाटे लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
लातूर (प्रतिनिधी)
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात दिनांक 7 जुलै ते 8 जुलै च्या मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवरील अचानकपणे गुन्हेगारांना ताब्यात त्यांच्या हालचाली बाबत माहिती घेण्यात येत होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, काही इसम गावठी पिस्टल जवळ बाळगून लातूर ते औसा जाणाऱ्या रोडवर कार मधून संशयितरित्या फिरत आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने लातूर ते औसा जाणाऱ्या रोडवरील एका पेट्रोल पंपा समोर थांबलेल्या कार मधील इसमांना ताब्यात घेत असताना अंधाराचा फायदा घेऊन सहा जणांपैकी दोन इसम पळून गेले. उर्वरित चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची व पळून गेलेल्या इसमा बाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
1) राहुल भगवान खिल्लारे, वय-28 वर्ष रा. आंबेडकर नगर हिंगोली
2) विशाल देविदास कदम, वय-27 वर्ष रा. जयभीम नगर नांदेड
3) राहुल वामन चिकलीकर वय-41 वर्ष रा. जयभीम नगर नांदेड
4)राहुल प्रकाश घोडजकर, वय-32 वर्ष रा. सावित्रीबाई फुले नगर नादेड
5) आमोल मधुकर वन्ने रा. जयभीम नगर नांदेड (फरार)
6) राधे सुर्यतळ रा. आंबेडकर नगर,नांदेड (फरार)
असे असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यातील पांढ-या रंगाची एम.एच 02 एफ.एन 3444 ईस्टीगा कंपनीच्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक स्टीलचा गावठी बनावटीचा पिस्टल अनाधिकृत व बेकायदेशीररीत्या मिळुन आले.
त्यावरून नमूद इसमांना ताब्यात घेऊन 50 हजार रुपयाचे गावठी पिस्टल व 7 लाख रुपयाची ईरटीका कार असा एकूण 7.5 लाख रुपयाच्या मुद्देमालासह पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांच्या ताब्यात घेण्यात आले असून भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असून पोलीस ठाणे विवेकानंद चौक पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, मनोज खोसे, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, सचिन मुंडे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.