कुरैशी समाजचा जानवर खरेदी बंद


 कुरैशी समाजचा जानवर खरेदी बंद 


---

📰औसा बाजार बंद... शेतकरी रडतोय, प्रशासन गप्प का?"
"जनावरांची खरेदी-विक्री बंदीमुळे शेतकऱ्यांचा उद्रेक – 'कुरेशी समाज आंदोलन केल्यास आमचं काय होईल?'



औसा : - औसा शहरात आजपासून संपूर्ण बाजार बंद ठेवण्यात आला असून, जनावरांची खरेदी-विक्री पूर्णतः थांबविण्यात आली आहे. या अचानक निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.जनावरांची खरेदी-विक्री ही मुख्यतः शेतकऱ्यांची उपजिविकेची आधाररेखा असते. परंतु, अचानक आलेल्या बंदीमुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
काही शेतकरी बैल, गाई, म्हशी घेऊन बाजारात आले होते, मात्र बाजार बंद असल्याने त्यांना रिकाम्या हाताने गावाकडे परत जावे लागले. त्यांचं म्हणणं आहे की, “आमचं नुकसान भरून कोण काढणार?”
या परिस्थितीवर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे "जर कुरेशी समाज बंदी विरोधात आंदोलन करत असेल, तर आमची अडचण अजून वाढेल... आम्हाला न्याय कोण देणार?"
शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता, प्रशासनाने त्वरीत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्याला आता प्रश्‍न पडलाय जनावरांच्या व्यवहारावरील बंदी कधी उठेल का नाही ? त्यामुळे औसा तालुक्यातील शेतकरी आणखी आडचणीत येतील का ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या