नागरसोगा येथे ढगफुटीसदृश्य पावसाचा कहर; घरात दोन फूट पाणी, नागरिक त्रस्त .....

 नागरसोगा येथे ढगफुटीसदृश्य पावसाचा कहर; घरात दोन फूट पाणी, नागरिक त्रस्त

.....






लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील नागरसोगा येथे मंगळवारी दिवसभर दोन वेळा झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे गावात हाहाकार माजला आहे. गावातील समद अजम्मोदीन शेख यांच्या घरात तब्बल दोन फूट पाणी शिरल्याने कुटुंबाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. दुपारी तीन ते चार या वेळेत झालेल्या अवकाळी पावसाने घरटी, शेतं व रस्ते पाण्याखाली गेले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्रीपर्यंत सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.


गावातील अनेक कुटुंबांच्या घरात पाणी घुसल्यामुळे साहित्याचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे मुलांना व वृद्धांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले. शेतकरी वर्गालाही याचा मोठा फटका बसला असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. आधीच अतिवृष्टीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे.


स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एवढ्या कमी वेळेत एवढा मोठा पाऊस पडणे ही ढगफुटीप्रमाणेच परिस्थिती होती. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन सर्वेक्षण करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी होत आहे. गावातील रस्त्यांवर चिखल, पाणी व वाहतूक विस्कळीत झाली आहे.


नागरसोमा सारख्या ग्रामीण भागात सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे पायाभूत सुविधा कोलमडत आहेत. हवामानातील सततच्या बदलामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने वेळीच नियोजन व उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा आपत्तीमुळे ग्रामीण जनजीवन आणखी विस्कळीत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या