प्रेषितांचे विचार यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली
सीमाब खान : सीरत कॉन्फरन्स व पारितोषिक वितरण
लातूर : प्रेषित हजरत मुहम्मद (सल्ल.) यांचे विचार सर्व मानवतेसाठी दिशादर्शक असून, ऐहिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्याची गुरूकिल्ली आहे. प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव, न्याय, समता, बंधुता, सदाचार, करुणा आणि एकोप्याचे मूल्य हे पैगंबरांच्या शिकवणीचे केंद्र आहे आणि हाच पाया समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे एसआयओचे दक्षीण विभागीय अध्यक्ष सीमाब खान यांनी सांगितले.
स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, लातूर तर्फे सीरत कॉन्फरन्स आणि सीरत नॉलेज टेस्टचे पारितोषिक वितरण कार्यक्रम साठ फुट रोड, एम.के. फंक्शन हॉल, लातूर येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी खान बोलत होते. मंचावर जमाअते इस्लामी हिंदचे केंद्रीय सदस्य तौफिक असलम खान, मुसद्दीक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सीरत नॉलेज टेस्टमध्ये सात शाळांतील ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मौलाना अबुल कलाम आझाद शाळेतील तुबा तोईज देशमुख प्रथम, रहेमानिया उर्दू शाळा निलंगा येथील अरबिया महेबूब बागवान द्वितीय आणि जाकेर हुसैन शाळा लातूरची समीरा रहीमखान पठाण ही तृतीय आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमास एसआयओचे शहराध्यक्ष जुनेद अकबर, एम.के. मनियार, नुसरत काद्री, इनामुल हसन, जमातचे सचिव अहेमद हाश्मी, जीआयओच्या झेडएसी सदस्या बुशरा काझी, जमाअतच्या महिला अध्यक्षा अमतुलअजीज राबिया शेख, अब्दुल्लाह मणियार, जहीर सय्यद, सुफियान शेख, मुजाहिद सय्यद यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागिरक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी एसआयओच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.