विनामुल्य वीरशैव लिंगायत वधुवर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी- बसवराज धाराशिवे
औसा (प्रतिनिधी ) : वीरशैव लिंगायत वधुवर परिचय मेळावा रविवार दिनांक 26/10/2025 रोजी लातूर येथे होणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. श्री. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे उत्तराधिकारी श्रीगुरु 108 राजेश्वर शिवाचार्य महाराज व श्रीगुरु गुरुराज महाराज भक्तीस्थळ अहमदपूर, पंढरपूर विठ्ठल रुक्मीणी देवस्थानचे सहअध्यक्ष व नाथ संस्थान औसा येथील गुरुवर्य ह.भ.प. श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे, असे श्री. बसवजराजप्पा धाराशिवे यांनी कळविलेले आहे. तसेच नोंदणी का करावी यासंबंधी विचार मांडताना सांगितले आपला जीवनसाथी आपल्या पसंतीनुसार निवडण्यासाठी मध्यस्थ किंवा दलाला पासून आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी वेळ व पैसा याची बचत करण्यासाठी आपली माहिती माहिती पुस्तकात येण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे मेळाव्यात प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने आपला पसंतीचे जीवनसाथीची समक्ष भेट होऊ शकते तेव्हा मेळाव्यात उपस्थित रहा व नोंदणी करा असे आवाहन वीरशैव लिंगायत वधु-वर याना केले.
प्रस्तुत मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रचार यंत्रणेत श्री. उमाकांत कोरे, श्री. राजाभाऊ (दादा) हालकुडे, श्री. तम्मा चौंडे, श्री. सुनिल भिमपुरे, श्री. महादेवप्पा लामतूरे, श्री. दिलीप होनराव (सूल्लाळीकर), श्री. बालाजी पिंपळे, श्री. बसवेश्वर हालकुडे, हे प्रत्येक तालुक्यात भेटी देत आहेत. याशिवाय अहमदपूर, उदगीर, रेणापूर, निलंगा, औसा, चाकूर, जळकोट, देवणी, शिरुर अनंतपाळ येथील स्थानिक कमिटीचे कार्यकर्ते सर्व गरजू बांधवांना मेळाव्याची माहिती देत आहेत. वधू-वर नोंदणीसाठी कोणतीही वर्गणी घेतली जाणार नाही. उपस्थित वधू-वर तसेच त्यांच्या समवेत आलेल्या पालकांची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 30 X 200 साईजचा भव्य वॉटरप्रूफ मंडप व सर्वांना कार्यक्रम व्यवस्थीत पाहता यावा यासाठी एल.ई.डी. स्क्रिन वॉलची व्यवस्था करण्यात येणार आहे. भोजन कमिटी, नोंदणी कमिटी, स्वागत कमिटी, संचलन कक्ष प्रचार कमिटी, माहिती पुस्तिका प्रकाशन कमिटी, जाहीरात व प्रसिध्दी कमिटी, स्टेज डेकोरेशन कमिटी, महिला आघाडी कमिटी, युवा आघाडी कमिटी अशा विविध कमिटया स्थापन करण्यात आलेल्या आहेत. संयोजक श्री. तम्मा चौंडे, श्री. नागेश कानडे, कार्याध्यक्ष श्री. राजाभाऊ हालकुडे, विश्वनाथ राचट्टे, स्वागताध्यक्ष श्री. दिलीप होनराव (सुल्लाळीकर) श्री. पवनकुमार कल्याणी, कार्यवाहक श्री. बालाजी पिंपळे, श्री. बसवेश्वर हालकुडे, उपाध्यक्ष श्री. सुनिल भिमपुरे श्री. शिवराज बुरांडे, सचिव श्री. सतिष कानडे, श्री. प्रशांत बोळेगावे, ग्रामीण उपाध्यक्ष श्री. शांतवीर मुळे (उदगीरकर) श्री. ओमप्रकाश गलबले (शिरुर अनंतपाळ), श्री. महेश कोळ कोळळे, श्री. वैभव विभुते, श्री. विवेक जाणते, श्री. मल्लिकार्जुनप्पा पेदे, श्री. भालचंद्र दाणाई, श्री. प्रभाकर कापसे, श्री. महादेव खिचडे, श्री. ओमप्रकाश झुरुळे, श्री. गणेश कानडे, श्री. मनमथ बोळेगावे, श्री. सुहास अष्टगे, श्री. काशिनाथ जनगावे, श्री. सोमनाथ लुल्ले, श्री. गौरीशंकरप्पा संकाये, अॅड पंकज कोरे, अॅड झिंजुरे, अॅड धुळे, श्री. आशिष स्वामी, श्री. मनमथ चिखले, श्री. राजाभाऊ उपासे, श्री. शिवा रोडे, श्री. प्रसाद नागुरे, श्री. शिवकुमार महाजन, या शिवाय अनेक कमिट्यांवर विविध कार्यकर्ते क्रियाशील झाले आहेत. लातूर व ग्रामीण महिला मंडळ नियोजनासाठी सज्ज झाले आहेत. लातूर शहरातील सर्व संस्थेच्या जेष्ठांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा 13 वा विनामूल्य व सर्वांत जास्त नोंदणी व योग्य माहिती पुस्तिका उपलब्ध होणार असल्याचे संपादक श्री. उमाकांत कोरे यांनी कळविलेले आहे. वधू-वरांची नोंदणी वीरशैव संस्कृतिक भवन, खंडोबा गल्ली, लातूर येथे सुरु आहे. अधिक माहितीसाठी 9420872812 / 8766823507 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.