उंबडगा बु . ग्रामस्थांची तात्काळ पिकविमा व अतिवृष्टी अनुदानाची मागणी ..

 उंबडगा बु . ग्रामस्थांची तात्काळ पिकविमा व अतिवृष्टी अनुदानाची मागणी ..




औसा तालुक्यातील उंबडगा येथील शेतकर्‍यांचे अतिवष्टीमुळे सोयाबिन सह खरीपाच्या पिकाचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाले असुन आज उंबडगा ग्रामस्थांनी औसा तहसिलदार यांना निवेदनाद्वारे अतिवृष्टी बाधित शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी व पिकविमा   सह सोयाबिन ला ८५०० रुपये भाव द्यावा अन्यथा आम्हा शेतकर्‍यांना गांजा लागवड करण्याची परवाणगी द्यावी अशी मागणी केली असुन 

उंबडगा ब .सह औसा तालुक्यातील शेतक-याचे अतिपावसाने  अतोनात नुकसान झाले आहे. उंबडगा ब शेतकर्‍यांच्या वतिने 

. तात्काळ पिकविमा व

अनुदान, सोयाबीनला प्रति क्विटल ८५००/- रुपये भाव देण्यात यावा अथवा सर्व शेतक-यांना गांजा पिक लावण्यासाठी परवानगी

देण्यात यावी असा  विनंती निवेदनाद्वारे औसा तहसिलदार यांना मागणी करण्यात आली .असुन वरील सर्व मागण्या 

 येणा-या आठ दिवसात मान्य कराव्या अन्यथा गांज्याची रोपे उपलब्ध करुन दयावी नसेल तर 

३/ १०/२००५ रोजी मौ. उंबडगा ब येथील सर्व शेतक-यांच्या वतीने

लेंढी  या ओढयात  शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचा ईशारा शेतकर्‍यांच्या वतिने  

 प्रशासनाला देण्यात आला आहे यावेळी  सुनिल बेंबडे .भागवत साळुंके .अक्षय चिकले, विजय उपासे, सज्जात पटेल, असलम शेख, , शांतीर मोरकुंडे, श्रीराम बेंबडे, लालासाहेब पाटील, राहुल मंदाडे, हरिचंद्र कोमवाड, भुजंग बोपले,सह शेतकरी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या