प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 116 लाभार्थ्यांना त्वरीत निधी द्या:खुंदमीर मुल्ला







प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 116 लाभार्थ्यांना त्वरीत निधी द्या:खुंदमीर मुल्ला

प्रतिनिधी=मुख्तार मणियार औसा
औसा शहरातील व परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचे तिस-या हप्त्याचे निधी त्वरीत द्यावी या मागणी चे निवेदन सामाजिक कार्यकर्ते खुंदमीर मुल्ला यांनी औसा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.औसा शहरात प्रधानमंत्री आवास योजनेखाली 245 लाभार्थ्यांना मंजूरी मिळाली असून, त्यापैकी 116 लाभार्थ्यांना या योजनेचे दोन हप्ते एकुण 1लाख रुपये प्राप्त झालेले आहेत.ज्यामुळे या 116 कुटुंबांनी स्वत:च्या राहता कच्चा घर पाडून बांधकाम अर्धवट झालेला आहे सध्या पावसाळा चालू झाल्यामुळे राहण्यासाठी अडचण निर्माण होत आहे सदरील कुटुंब सध्या तात्पुरता शेड मारुन किंवा भाड्याने राहत असल्यामुळें त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.तरी वरील बाबींचा विचार करून त्यांना या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे शिल्लक निधी त्वरीत त्यांना उपलब्ध करून त्यांना थेट त्यांच्या खात्यात जमा करा जेणेकरून ते लाभार्थी त्यांचे घरांचे अर्धवट बांधकाम पूर्ण करतील.या मागणीचे निवेदन दि. १५जून २०२० रोजी औसा तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांना दिले. या निवेदनावर खुंदमीर मुल्ला यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या