माजी कामगार मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्‍तदान शिबीराचे आयोजन







माजी कामगार मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्‍तदान शिबीराचे आयोजन

लातूर दि.17/06/2020
राज्याचे माजी कामगार मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 20 व 21 जून रोजी सकाळी 11 वा लातूर शहर (ग्रामीण) भागात विविध ठिकाणी भव्य असे रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रक्‍तदान शिबीरामध्ये सोशल डिस्टसिंगचे पालन करून हे रक्‍तदान शिबीर यशस्वीरित्या पार पाडले जाणार आहे. यामध्ये 20 जून रोजी सकाळी 11 वा. स्वामी विवेकानंद इंन्स्टीट्युट ऑफ पॉलिटेक्निक, जे.एस.पी.एम.कॅम्पस,एमआयडीसी,लातूर महाराष्ट्र विद्यालय, मजगे नगर,लातूर, भालचंद्र ब्लड बँक,लातूर आदी ठिकाणी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत कोरानोच्या पार्श्‍वभूमिवर सोशल डिस्टसिंगचे पालन करून भव्य रक्‍तदान शिबीर घेण्यात येणार आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेे या रूग्णांना लागणार्‍या रक्‍ताची गरज लक्षात घेवून भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून माजी कामगार मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहरातील व ग्रामीण मधील तीन अशा सहा ठिकाणी रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 20 जून रोजी सकाळी 11 वा. स्वामी विवेकानंद इंन्स्टीट्युट ऑफ पॉलिटेक्निक, जे.एस.पी.एम.कॅम्पस,एमआयडीसी,लातूर, महाराष्ट्र विद्यालय, मजगे नगर,लातूर, भालचंद्र ब्लड बँक,लातूर आदी ठिकाणी भव्य रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर 21 जून रोजी लातूर शहर (ग्रामीण) परिसरातील कव्हा, पाखरसांगवी, आर्वी आदी ठिकाणी रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर कोरोना रूग्णांची संंख्या वाढत आहे.त्यामुळे या वाढत्या रूग्णांसाठी रक्तांचा तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे या रूग्णांना आधार मिळावा यासाठी माजी कामगार मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमीत्त भाजपा युवा मोर्चाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेल आहे. रक्तदान अमुल्य आहे.त्यामुळे रक्तदान करूया आणी प्रेमाचे नाते जोडूयात कुठेतरी कोणालातरी तुमच्या रक्ताची गरज आहे.ही बाब लक्षात घेवुन कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे भाजपा युवामोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी या रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे, असे अवाहन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या