रोटरी'च्या उपप्रांतपालपदी मेघराज बरबडे यांची निवड लातूर (प्रतिनिधी) : रोटरी इंटरनॅशनलच्या डिस्ट्रीक्ट 3132 च्या उपप्रांतपालपदी श्री. मेघराज बरबडे यांची निवड करण्यात आली






'रोटरी'च्या उपप्रांतपालपदी
मेघराज बरबडे यांची निवड
लातूर (प्रतिनिधी) : रोटरी इंटरनॅशनलच्या डिस्ट्रीक्ट 3132 च्या उपप्रांतपालपदी श्री. मेघराज बरबडे यांची निवड करण्यात आली.
           सामाजिक कार्यात सहभागी असणारे रोटरीचे क्रियाशील सदस्य मेघराज बरबडे यांची सन 2020-21 साठी रोटरीचे प्रांतपाल हरिष मोटवाणी यांनी उपप्रांतपाल पदी निवड केली आहे
         रोटरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक कार्य करणारी संस्था असून त्यांच्या वतीने जगभरात वंचित गरजू घटका साठी अत्यावश्यक कार्यक्रम राबविले जातात . 3132 विभाग म्हणजे संपूर्ण मराठवाडा  सोलापूर, सातारा,   अहमदनगर या परिरसाचा एक विभाग आहे त्यांच्या लातूर - उस्मानाबाद  भागासाठी मेघराज बरबडे यांची निवड झाली आहे.
येत्या वर्षेभरात नव्याने उदभवलेल्या करोना रोगाच्या प्रतिकारासाठी जास्तीत जास्त काम केले जाईल,  शस्त्रक्रिया शिबीरे घेतले  जातील. व्यवसाय, रोजगार मार्गदर्शन शिबीरे आयोजित केले जातील, असे त्यांनी सांगितले.
         मेघराज बरबडे यांच्या निवडी बदल विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सह अध्यक्ष सदगुरू गहिनीनाथ महाराज  औसेकर यांनी त्यांचा सत्कार करून आर्शीवाद दिला. अलगरवाडीचे सरपंच गोविंदराव माकणे, भावी प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, संजय बोरा, गिरीश ब्याळे, सी. ए. अमोल जाधव,  माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे यांनी निवडीचे स्वागत केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या