अंध,अल्पभूधारक,मागासवर्गीय शेतकर्याने वरकमाई
दिली नाही,एसबीएच बँकेने कर्जमाफी बाहेर ठेवले..!
चेअरमनकडे केली तक्रार, उपोषण करण्याचा इशारा
लातूर,दि.२९ः शेतकरी कर्जमाफीची यादी बनविताना खास एजंटाकरावी वरकमाई दिली नाही म्हणून, तुळजापूर येथील भारतीय स्टेट बँकेने मला कर्जमाफी यादीच्या बाहेर ठेवून अन्याय केल्याचा आरोप करुन,या संदर्भात बँकेच्या चेअरमनकडे लेखी तक्रार करत, न्याय द्यावा अशी मागणी अंध,अल्पभूधारक,मागासवर्गीय शेतकरी तुकाराम बाबूराव रोकडे (आपसिंगा,ता.तुळजापूर) ह.मु.लातूर यांनी केली असून, न्याय न दिल्यास बँकेसमोर उपोषण करणाचा इशारा सदर प्रतिनिधिशी बोलताना दिला आहे.
सदर निवेदनात तुकाराम रोकडे यांनी म्हटले आहे की, मी अंध,मागासवर्गीय, अल्पभूधारक शेतकरी असून, माझी आपसिंगा ता.तुळजापूर येथे पावणे पाच एकर जमीन आहे,.शेतीत विहीरीला पाणी,पाईपलाईन आहे.शेतीत गतवर्षी सामाजिक वनीकरणकडून चिंच,आंबा,जांभळ आदी २०० झाडांची लागवड व संगोपन केले आहे, आता आणखी २०० देशी झाडे सामाजिक वनीकरणकडून मंजूर झाली असून,त्यासाठी खड्डे खोदणे आवश्यक आहे,सध्या येथे बर्यापैकी पाऊस झाल्याने शेतीत सोयाबीन,कांदे पीक घेण्यासाठी तुळजापूर येथील भारतीय स्टेट बँकेकडे एक लाख रुपयांची कर्ज मिळण्यासाठी फाईल करुन बँकेत दाखल करण्यासाठी गेलो असता, बँक शाखाधिकार्यांनी मी कर्जमाफीस पात्र असलो तरी, तुमचे नाव कर्ज माफीच्या यादीत नसल्याचे,तसेच नवीन कर्ज मिळणार नाही,म्हणत अपमानास्पद,अरेरावीची भाषा करुन कॅबिनमधून हुसकावून लावले,मानसिक त्रास दिला,कर्जमाफी यादी संदर्भात सहकार विभाग,बँक,तहसील यांच्याकडे चकरा मारुन कांहीच दाद दिली जात नाही,असा आरोप रोकडे यांनी केला आहे.
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मागे कर्ज माफीची यादी तयार करताना या सदर बँकेने एका एजंटामार्फत, कर्जमाफीच्या यादीत घालण्यासाठी अनेक शेतकर्यांकडून बेकायदा हजारो रुपयांची वरकमाई चालू केली होती.मलाही त्यावेळी त्या एजटाने तीन हजार रुपयंाची मागणी केली गेली होती पण मी त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता.त्याचा हा परिणाम तर नसावा,असा सवाल करुन माझ्या तक्रार अर्जाची गांभीर्याने दखल घेवून मला तातडीने नवीन कर्ज देण्याचे आदेश द्यावेत,माझे कर्ज माफीत नाव समाविष्ठ का केले नाही, याची चौकशी करावी,माझ्याकडील २०१६-१७ मधील कर्ज माफ व्हावे अशी मागणी तुकाराम रोकडे या अंधाने बँक चेअरमनकडे केली असून, न्याय न मिळाल्यास बँकेपुढे नाविलाजाने उपोषण करावे लागेल असा इशारा सदर प्रतिनिधीशी बोलताना दिलाय.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.