प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाकडून
तपसे चिंचोली येथील लक्ष्मण कांबळे याना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानीत
-----------------------------------------------
प्रतिनिधी :-
औसा तालुक्यातील तपसे चिंचोली
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र24 आवाज न्यु चे उपसंपादक याना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व जण विकास सेवाभावी संस्था याचे कडून लक्ष्मण कांबळे याना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे
कांबळे हे समाज उपयोगी कार्यक्रमात नेहमीच आग्रस्थानी असतात कोविड १९या संसर्गजन्य काळात अनेक गोरगरिबांना व गरजूंना लॉक डाऊन च्या काळात मदत मिळून दिले आहेत तसेच परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत करून त्यांना खाण्यासाठी लागणारी जीवनावशक्य वस्तूचे ही वाटप करण्यात आले आहे सामाजिक बांधिलकी जपत कांबळे यांनी केलेल्या समाज कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा डी टी आंबेगावे व जण विकास सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सय्यद मुश्ताक मुख्तार हाश्मी यांनी लक्ष्मण कांबळे याना कोविड योद्धा म्हणून सोशल मिडयाच्या मध्यमा द्वारे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले याबद्दल लक्ष्मण कांबळे यांचे सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.