सोयाबीन बियांनाच्या संबंधित कंपन्यावर गुन्हे दाखल करुन दोषींवर योग्य ती कारवाई करावी एम आय एम ची तक्रारीची मागणी
प्रतिनिधी=मुख्तार मणियार औसा
औसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कृषी दुकानाकडून नामांकित कंपन्यांचे सोयाबीन-बियाणे खरेदी करुन आपल्या शेतात त्या बियाण्याची पेरणी केली. पेरणीला आठवडा उलटला तरी बियाण्याची उगवण झालीच नाही.परिणामी औसा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.अगोदरच कोरोना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हे दुहेरी संकट आल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे .औसा तालुक्यातील उगवण न झालेले सोयाबीन बियाणे कंपन्यावर गुन्हे दाखल करुन दोषींवर योग्य ती कारवाई करावी .अशी तक्रार एम आय एम पक्षाच्या वतीने औसा पोलीस स्टेशन येथे औसा पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांना दि.30 जुन 2020रोजी दिली आहे या तक्रारीत औसा तालुक्यातील 35ते40 टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे उगवण क्षमता नसल्याने सोयाबीनच्या पिकावर संकट आल्याने व दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने याबाबत यशोदा,ग्रिनगोड,ईगल, महाबीज या कंपन्यांनी डुप्लीकेट बियाणे विक्री करुन शेतकऱ्याची फसवणूक केली आहे अशा फसवणूक करणाऱ्या सोयाबीन बियांनाच्या कंपन्यावर आपल्याकडे गुन्हा दाखल करुन दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा.अशी तक्रारीत नमूद केले आहे या तक्रारीचे निवेदनावर एम आय एम चे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.