लातूर तहसीलचे पेशकार बालाजी आब्रे पाटील यांना सेवानिवृत्तीबद्दल भावपूर्ण निरोप





लातूर तहसीलचे पेशकार बालाजी आब्रे            पाटील यांना सेवानिवृत्तीबद्दल भावपूर्ण निरोप
लातूर,दि.३०ः लातूर तहसील कार्यालयातील पेशकार बालाजी आंब्रे पाटील हे आज मंगळवार ,दि.३० जून २०२० रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांंचा सहचारिणी सुमनताई यांच्या समवेत त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि छ.शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देवून उपविभागीय अधिकारी सुनील व तहसीलदार स्वप्नील पवार यांच्या हस्ते सत्कार करुन भावपूर्ण निरोप देण्यात आला.
        सर्वसामान्य,सामाजिक कार्येकर्ते आणि प्रशासनातील सहकारी यांच्याशी अतिशय प्रेमळ वागत हसतमुखाने काम करणारे बालाजी आब्रे पाटील हे १९८३ मध्ये हजेरी सहाय्यक म्हणून सार्वजनिक बांधकाम  विभागात सेवेत दाखल झाले. सन २००६ मध्ये त्यांचे महसूल विभागात समायोजन करण्यात आले. आणि औसा तहसीलमध्ये पेशकार म्हणून ते रुजू झाले.पुढे सन २०१४ मध्ये त्यांची लातूर तहसीलमध्ये बदली झाली. गेली सहा वर्षात त्यांनी येथे अतिशय सहजतेने काम करुन सर्वसामान्यांंसह वरिष्ठांचे मने जिंकली.जनतेचे काम अडू नये ही त्यांची तळमळ असायची.आज दि.३० जून २०२० रोजी महसूल खात्यातील १५वषार्ंंची सेवा बजावून सेवानिवृत्त झाले.त्यांचा उपविभागीय अधिकारी सुनील यादव,तहसीलदार स्वप्नील पवार यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात आला.
याप्रसंगी नायब तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार श्रावण उगले, नायब तहसीलदार सुधीर देशमुख,पेशकार महादेव पांचाळ,लिपीक पटेल, तलाठी महेश हिप्परगे,लिपीक पत्री सह तलाठी, पेशकार,तलाठी,मंडळ अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या