एम आय एम पक्षाच्या वतीने महिला बचत गटांना व पुरूष बचत गटांना पूर्ण पणे कर्ज माफ करा या मागणी चे निवेदन औसा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री ना निवेदन
प्रतिनिधी=मुख्तार मणियार औसा
दिनांक=12/06/2020
लातूर जिल्ह्यातील औसा येथे ए आय एम आय एम च्या वतीने महिला बचत गटांना व पुरूष बचत गटांना कर्ज माफी द्यावी ह्या मागणी चे निवेदन औसा तहसिलदार मार्फत दिनांक 12 जुन 2020 शुक्रवार रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की covid19 (कोरोना)मुळे उदभवलेल्या परिस्थितीने आर्थिक संकटात सापडलेल्या महिला बचत गटांचे व पुरूष बचत गटांचे मायक्रो फायनान्स कंपनी कडून बचत गटांना व पुरूषांना वितरित झालेले सुक्षम,लघु, उद्योग कर्ज माफ करण्यात यावे,गेल्या चार महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे हाताला काम नाही, त्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असल्यामुळे पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.यातच मायक्रो फायनान्स कंपनी कडून हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. रिझर्व्ह बँकेने हफ्ता न भरण्याचे आदेश दिले असताना देखील सदरील फायनान्स कंपन्या बैठका घेत आहेत.बचत गटातील सर्व महिला व पुरुष आर्थिक अडचणीत आल्याने व कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने कर्जाचे हफ्ते कसे भरायचे हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे तरी मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित मायक्रो फायनान्स कंपनी सोबत बोलून महिला बचत गटांना व पुरुष गटांना पूर्ण पणे कर्ज माफी देण्यात यावी या मागणीसाठी औसा तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले यावेळी एम आय एम चे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार,एम आय एम चे सिनियर नेते अॉड गफुरूल्ला हाशमी, एम आय एम चे युवा नेता सय्यद कलीम, शेख मुजम्मिल, देशमुख अब्दुल,न्यामत लोहारे व बचत गटांचे महिला व पुरुष आदि उपस्थित होते .

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.