भारत प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल



............................

भारत प्राथमिक माध्यमिक
विद्यालयाचा 100 टक्के निकाल

लातूर/प्रतिनिधी ः शहरातील लेबर कॉलनी येथील भारत प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाचा दहावी परिक्षेचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातून शेख साहिल सलीम प्रथम, हाके संदीप खंडू व जाधव ऋतुजा सोमनाथ द्वितीय तर आदमाने ऋषीकेश तानाजी तृतीय क्रमांक मिळविला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष आर.जी. राठी सर, सचिव अ‍ॅड. एल.ई. भागवत सर, संस्था समन्वयक साळुंके सर, शालेय समिती अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी सर, बाळासाहेब नाडे, सूर्यकांत लपटे, पाटील सर, डॉ. राहुल लटुरिया, मुख्याध्यापक निटूरे सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
.............................

आदित्य कनगुले याचे दहावी परीक्षेत सुयश
लातूर/प्रतिनिधी ः येथील परिमल विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य संतोष कनगुले याने दहावी बोर्ड परीक्षेत 96.60 टक्के गुण मिळवून इयत्ता दहावी परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. आदित्य कनगुले याने मिळविलेल्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका व मित्रपरिवार यांच्याकडून कौतुक होत असून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मराठवाडा केसरी टीमच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या