*दहावी बोर्ड परीक्षेत शेख अरशद नबीसाब याने 95 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले*
लातूर येथील देशिकेंद्र विद्यालय येथे दहावी वर्गात शिकणारा शेख अरशद नबीसाब याने दहावी बोर्ड परीक्षेत 95 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केलं, त्याच्या यशाबद्दल विविधस्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.
शेख अरशद नबीसाब हा विद्यार्थी विलासराव देशमुख युवा मंचचे जिल्हा सरचिटणीस सरवर शेख यांचा पुतण्या आहे, त्याने दहावी बोर्ड परीक्षेत 95 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविल्याबद्दल प्राचार्य ए. जी. पटेल, जे. जी. सगरे, नबी सर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.