राज्याच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन.



राज्याच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन.

राज्याच्या पहिल्या महिला माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन झाले आहे. त्या 72 वर्षांच्या होत्या. मुंबई येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. त्या 1972 च्य आयएएस बॅचच्या अधिकारी होत्या. निला सत्यनाराण यांनी विविध महत्त्वाच्या सरकारी पदांवर काम केले. अत्यंत अभ्यासू, कष्ठाळू, प्रामाणिक आणि होतकरु अशी त्यांची ओळख होती.वयाच्या 37 व्या वर्षी नीला सत्यनाराण या सनदी अधिकारपदाच्या सेवेत रुजू झाल्या. त्यांनी मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या पदांवर काम केले. लोकसंपर्क हा नीला सत्यनाराण यांच्या जीवनाचा भाग होता. एका मुलाखतीदरम्यान, त्यांनी सांगितलं होतं की, “लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, आयएसआय होण्यासाठीचे बळ पतीने दिले आणि त्यामुळे आयएसआय झाले.”. स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड मत मांडण्याबाबत त्या प्रसिद्ध होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या