मरखेल पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांचे आव्हान .
देगलूर प्रतिनिधी
मरखेल पोलिस स्टेशन हदित्तील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की उद्या दि 1/08/2020 बकरी ईद व साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे. सध्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत अमदापुर, मोतीराम तांडा,भूतन हिप्परगा, मरखेल येथे कोरोनाचे रुग्ण मिळून आलेले आहेत. त्यामुळे जयंती ही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन साजरी ना करता आपल्या घरीच साजरी करावी.सार्वजनिक ठिकाणी प्रतिमेस अगर पुतळ्यास हार घालण्यासाठी व झेंडा वंदन करण्यासाठी फक्त दोन व्यक्तींनी जावे. सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईद ची नमाज सार्वजनिक ठिकाणी मस्जित मध्ये एकत्र येऊन अदा न करता सर्वांनी आपल्या घरातच नमाज अदा करावी. कोणीही एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावतील आशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये. जयंती व ईद ही सामाजिक बांधिलकी जपून साजरी करावी.
सर्वांनी मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. सध्या जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू आहेत 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास मनाई करन्यात आलेली आहे कोणीही मिरवणूक,सामूहिक कार्यक्रम ठेवू नयेत.अणाभाऊ साठे जयंती निमित प्रतिमेस हार घालून झेंडा वंदन करावे कोणीही एकत्र येवूनये .
तसेच ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत त्यांनी त्वरित शासकीय यंत्रणेस माहिती द्यावी. खाजगी उपचार घेऊन घरामध्ये थांबू नये. त्यामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे ते नक्कीच बरे होतील परंतु ते इतर लोकांच्या संपर्कात आल्यामुळे ज्या लोकांना पूर्वीचे आजार आहेत त्यांना कोरोनाची लागण होऊन जीव गमवावा लागेल.
मी कोरोना पॉसिटीव्ह झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचार घेतले आहेत व बरा होऊन घरी परत आलो आहे. शासकीय रुग्णालयात देखील चांगले उपचार मिळत आहेत. देगलूर मध्ये व नांदेड येथील शासकीय रुग्णालयात चांगले उपचार मिळत आहेत. एका रुग्णामागे दीड लाख रुपये मिळतात, ह्या सगळ्या चुकीच्या अफवा आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांनी चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता काही त्रास असल्यास स्वतः पुढे होऊन लवकर टेस्ट करून घ्यावी.व वेळेत उपचार घ्यावेत त्यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही.
आदित्य लोणीकर
सहा पोलीस निरीक्षक
मरखेल पोलीस स्टेशन
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.