भिम आर्मीच्या लढ्याला प्रचंड यश.* *स्वाधार योजनेंतर्गत लाखो विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदानाची रक्कम*

 *भिम आर्मीच्या लढ्याला प्रचंड यश.*


*स्वाधार योजनेंतर्गत लाखो विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदानाची रक्कम*






लातुर प्रतिनिधी:-–

   इ.११वी,१२वी.आणि त्या नंतरच्या व्यवसायिक अभ्यास क्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या *अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.* ह्यापूर्वी ह्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना  सन २०१६-१७ पासून सामाजिक न्याय विभागाने सुरुवात केली होती. परंतु आजपर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाने संबंधित विद्यार्थांच्या बॅंक खात्यात विद्यार्थांना  मिळणारी रक्कम जमा केल्या जात नव्हती.त्यामुळे *जे विद्यार्थी बाहेरगावी शिकतात त्यांना अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना  सामोरे जावे लागत होते. सदर विद्यार्थांना थकित घरभाडे, खानावळी, इत्यादि खर्च देण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या.विद्यार्थ्यांच्या ह्याच समस्या लक्षात घेऊन संबंधित खात्याचे मंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांना भिम आर्मीच्या वतीने निवेदने देण्यात आली.* इतकेच नव्हे तर ह्याच प्रश्नांवर *भिम आर्मी आणि भिम आर्मी संलग्न भिम आर्मी स्टुडंट फेडरेशन यांच्यासह महाराष्ट्रातील इतर आंबेडकरी संघटनांनी सोशल मीडियावर हॅशटॅग चालवून मोठे आंदोलन केले.*

                   *संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार* आणि *भिम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह , राष्ट्रीय मुख्य महासचिव भाई कमलजी वालिया आणि राष्ट्रीय मुख्य उपाध्यक्ष मनजीतसिंह नौटीयाल यांच्या अनमोल सूचनेनुसार  भिम आर्मीच्या नॅशनल वर्किंग कमिटीचे सदस्य , राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भिम आर्मीचे शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार , ऊर्जामंत्री मा.ना.डॉ.नितीनजी राऊत तसेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांस मंत्रालयात भेटून निवेदन दिले.राज्यात भिम आर्मीच्या सर्व जिल्हाप्रमुख/तालुकाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील जिल्हाधिकारी/तहसीलदार ह्यांस निवेदने दिली.

               आज भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयत्नांना , लढलेल्या सामूहिक लढ्याला प्रचंड यश मिळाले असून शासनाने एक परिपत्रक जारी करून स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम त्वरित टाकण्याचे आदेश दिले असून मा.अशोकभाऊ कांबळे यांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करताना भिम आर्मी सह हा लढा लढणाऱ्या सर्व संघटनांचे , भिम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे , भिम आर्मीच्या सर्व जिल्हाप्रमुख/तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी-कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून , पुढील लढ्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहाण्याचे विनम्र आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या