श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
उस्मानाबाद ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी )
मेजर ध्यानचंदसिंग यांचा जन्मदिवस संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दि.29 ऑगस्ट रोजी मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.भिलसिंग जाधव, प्रा.नारायण सोलंकर, डॉ.सायबण्णा घोडके, डॉ.नागोराव बोईनवाड, डॉ.महेश मोटे, डॉ.किरण राजपूत, डॉ.अविनाश मुळे, डॉ.महादेव कलशेट्टी, प्रा.दिनकर बिराजदार, डॉ.नरसिंग कदम, डॉ.नागनाथ बनसोडे, प्रा.प्रकाश कुलकर्णी, एम.सी.पाटील, शिवपुत्र सोलापूरे, चंद्रकांत पुजारी, व्यंकट मंडले, आदींसह विद्यार्थी - विद्यार्थिनी, उपस्थित होत्या. यावेळी प्राचार्य डॉ.सपाटे यांनी बोलताना क्रीडा दिन सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्वाचा असून कोरोनाच्या महामारीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनीनी स्वतःच्या आरोग्यासोबत समाजाचे देखील आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजकुमार रोहीकर व सूत्रसंचालन प्रा.अशोक बावगे यांनी केले तर आभार प्रा.सोमनाथ बिरादार यांनी मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.