राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा दिन साजरा

 

राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा दिन साजरा









लातूर
राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात  आला.

या निमित्ताने महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंह यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य कर्नल एस ए वरदन यांनी मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरी वरील आलेख सविस्तर मांडला. तसेच या निमित्ताने राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल मधील विविध क्रीडा स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी रजिस्ट्रार प्रवीण शिवनगीकर, विद्या साळवे, विक्रम माने, क्रीडा शिक्षक शैलेंद्र डावळे, सुनील मुनाळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या