विवेकानंद युवा मंडळाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
उस्मानाबाद - ( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी ) सध्या कोरोना आजारामुळे गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लावण्यात आलेले आहेत, त्यातच गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रशासनामार्फत फिरत्या विसर्जन टँकचे नियोजन करण्यात आलेले आहे. या विसर्जन टँक सोबत पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावावा व प्रत्येक टँक सोबत विवेकानंद युवा मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम करतील, तेथील विसर्जनाचे
पुर्णपणे नियोजन सांभाळतील, अशा प्रकारचे एक निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. कार्यालयातील अधिकार्यांनी विवेकानंद युवा मंडळाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून "या कार्यामुळे प्रशासनास खूप मोठी मदत होणार असल्याचे देखील सांगितले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेऊन युवाशक्तीला प्रशासनाच्या मदतीस आणले, याबद्दल संबंधित अधिकारी यांनी आभार मानले व त्यासंबंधीचे निर्देश लवकरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगरपालिकेला दिले जातील" असे देखील सांगितले. माहितीस्तव हे निवेदन शहर पोलीस निरीक्षक संदीप मोदे साहेब यांना देखील देण्यात आले. यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, समन्वयक स्वप्नील देशमुख, सहसचिव महेंद्र जाधव, तज्ञ संचालक क्रांतिसिंह काकडे व आदी सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.