बार्शी रोडवरील मांजरेश्वर हनुमान मंदिरांचे समोर भाजपाने आंदोलन केले ।
कुलूप काढून भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे द्वार झाले खुले ।।
लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने व्यंकटराव पनाळे यांच्या नेतृत्वात मंदिर उघडण्यासाठी घंटानाद व भजन करून आंदोलन.
लातुर : दि. २९ - भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब, विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. आ. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश संघटन सरचिटणीस मा. श्री. विजयराव पुरानिक साहेब, भाजपा नेते मा. आ. श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर, लातूर शहर जिल्हाध्यक्ष मा. श्री गुरुनाथ मगे यांच्या मार्गदर्शनानुसार आज लातूर शहर जिल्ह्यात सर्वच धर्मीयांचे मंदिरे, मस्जिदी, चर्च, गुरुद्वारे, हि धार्मिक स्थळे खुले करण्यात यावेत या मागणीसाठी वेगवेगळ्या धार्मिक संस्थानी आणि त्यात प्रामुख्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन आंदोलन केले. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून लातूर पासून १२ किलोमीटर अंतरावर बार्शी रोडवरील मांजरेश्वर हनुमान मंदिराच्या समोर " दार उघडा उद्धवा मंदिराचे दार उघडा " अशा घोषणा देत व मंदिराच्या प्रवेशद्वारावर भजन करत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भाजपाचे व्यंकटराव पनाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात भाजपा लातूर तालुका सरचिटणीस किरण मुंडे, संभाजीराजे मंडल सचिव संदिपान कोंडमगिरे, हरंगुळ (बु) ग्रामपंचायतचे माजी सरपंच डॉ. राम गजधने, श्याम नगर ग्रामपंचायत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संपत शिंदे, श्याम नगर सरपंच नरेंद्र बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य रमेशदादा मीठापल्ले, भारतीय जनता युवा मोर्चाचे पृथ्वीराज कुरे पाटील, सुरज ईटकर, विनोद बनसोडे, गोविंद मुंडे चिंचोलीराववाडीकर, ह. भ. प. वसंतराव पांचाळ महाराज, भाजपा महिला आघाडीच्या सुनीताताई माडजे, आबा पांचाळ, विनायक पांचाळ, हरंगुळ बु. मंदार येथील विष्णुदासदादा पाटे, शंकरराव आयलाने, निवृत्तीराव तिगीले, भजनी मंडळाच्या अध्यक्षा राधाबाई पाटे, रेवताताई चामे, सुनिताताई गुरमे, भागीरथीबाई पनाळे, रूक्मीनबाई सोनवणे, लताताई पनाळे आदी सहभागी झाले होते.
याप्रसंगी आंदोलकासमोर भाजपाचे व्यंकटराव पनाळे यांचे मंदिर उघडण्याच्या आंदोलनाबाबत मार्गदर्शन झाले. तसेच विष्णुदासदादा पाटे यांनी सर्वांचे आभार मानले.
या आंदोलनामुळे मंदिर व्यवस्थापनाने प्रवेशद्वाराचे कुलूप काढून आंदोलकांना मंदिरात प्रवेश दिला. प्रवेशानंतर मांजरेश्वर हनुमानाची आरती करण्यात आली. शेवटी सौ. सावित्रीबाई जनार्दन कुंभार यांनी सर्व भजनी मंडळाला आणि आंदोलकांना चहापान करून आंदोलनाची सांगता झाली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.