अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या यासाठी मनसेचे कृषिमंत्री दादा भुसे याना निवेदन
औसा मुख्तार मणियार
अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दि 27 सप्टेंबर 2020 रविवार रोजी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे.यावर्षी संपूर्ण राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिक परिस्थिती चांगली होती परंतु ऐन मूग, उडीद काढणीच्या वेळीही आणि आता सोयाबीन काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन,मूग,उडीद,सूर्यफूल,इ.शेतीपीके उध्वस्त झाली आहेत.तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसाचे उभे पीक अतिवृष्टीसोबत झालेल्या वादळी वाऱ्याने भुईसपाट झाले आहे.यासाठी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष
संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजारांची मदत द्या या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
यावर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी शेतकऱ्यांना पेरणीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला होता.कारण नामांकित कंपन्यांचेही पेरलेले बियाणे न उगल्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना दुबार-तीबार पेरणी करावी लागली होती.यावेळी कृषिमंत्र्यांनी दुबार-तीबार पेरणी कराव्या लागलेल्या शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत मात्र मिळाली नाही.तसेच यावर्षी लॉकडाऊन मुळे 40 ते 50 टक्के उन्हाळी कांदा लॉकडाऊनमूळे जाग्यावर सडला व कांद्याला भावही मिळाला नाही.तर अनेक शेतकऱ्यांचा पावसाळी कांदा अतिवृष्टीने शेतातच सडला.व त्यात आता केंद्रसरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.तसेच यावर्षी लोकडाऊनमुळे मागणी कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधालाही भाव मिळत नाही.अशाप्रकारे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आताही एवढ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होवूनही फक्त पंचनाम्याचा फार्स सुरू होइल पण मदत मिळेल असे वाटत नाही.काबाडकष्ट करूनही हाता-तोंडाशीआलेली नगदी पिके अतिवृष्टीने उध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून संपूर्ण शेती व्यवसाय कोलमडून पडली आहे.चोहीबाजूने आर्थिक गणित बिघडलेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याचा फेऱ्यात न अडकवला तात्काळ सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये सरकारने देने गरजेचे आहे.यासोबतच पीकविमा कंपनीने सरसकट पंचनामे करून ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला आहे.अशा शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर करावा व झालेल्या नुकसान भरपाईपोटी विम्याची अग्रीम मावेजा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दसरा दिवाळी सणापूर्वी जमा करावी.तसेच रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शासनाने पेरणीकरिता लागणारे बी बियाणे व खते राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने,भागवत शिंदे,शिवकुमार नागराळे उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.