विना मास्क फिरणा-यावर औशात दंडात्मक कार्यवाही
औसा=मुख्तार मणियार
औसा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला असून लातूर जिल्ह्यात कोरोना झालेले रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची व जनतेची चिंता वाढली आहे..औसा शहरात विना मास्क फिरणा-या चार चाकी आणि दोन चाकी वाहनाचा वाढत्या गर्दीमुळे प्रशासन अनलॉक नंतर हतबल झाले आणि.परंतू शहरातील गर्दी रोखण्यासाठी दि.28 सप्टेंबर 2020 सोमवार रोजी मास्कचा वापर न करता फिरणारे नागरिक, वाहन चालक, व्यवसायीक व ग्राहकांना दंड आकारण्याची धडक कार्यवाही नगरपालिकाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी पालिका प्रशासन खडबडून जागि झाले आहे.आवश्यक कामासाठी बाहेर पडा,मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा,कोरोना टाळा अशी कोरोनाची जनजागृती नगर पालिकेच्या वतीने करण्यात आली. यावेळी औसा पोलिस ठाण्याचे हवालदार दिलीप लोभे यांनी आपल्या गीत मधुन कोरोना विषयी लोकांमध्ये जनजागृती केली.यावेळी औशाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, उपनगराध्यक्ष अलीशेर कुरेशी, स्विकृत सदस्य रुपेश दुधनकर, नगरपरिषदेचे कर्मचारी आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.