.
पाऊस आणि पुरामुळे झालेले नुकसान आणि कृषी विषयक योजनांची कृषी मंत्री दादाजी भुसे यांची आढावा बैठक
औसा मुख्तार मणियार.
दिनांक 27 सप्टेंबर 2020 रविवार रोजी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आणि कृषी विषयक योजनांची आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीस उपस्थित राहून औसा मतदार संघासह लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल मंत्री महोदय समोर मांडला पेरलेले बहुतांश बी उगवले नसल्याने दुबार ,पेरणी करावी लागली, पावसाने उघाड दिल्यामुळे उत्पादनात घट आली पुन्हा त्यात रोग पडला आणि या या सगळ्यातून वाचलेलं अतिवृष्टीमुळे हातचे निघून गेले आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील 100% सोयाबीनचे नुकसान झाल्याचे घोषित करून शेतकरी बांधवांना सरसकट मदत द्यावी अशी आग्रही विनंती कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. यावेळी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहनपर घोषित केलेले 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, शेततळ्याची प्रलंबित देयके देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून पोखरा योजनेअंतर्गत सामूहिक शेततळे घटकांचा पुनर्विचार समावेश करण्यात यावे, यांत्रिकीकरण योजनांतर्गत महा पोर्टल डीबीटी वर शेतकऱ्यांचे अर्ज डाउनलोड होत नसल्यामुळे शासनाने ऑफलाइन अर्ज स्वीकारावे व रेशीम उद्योग योजना पोखरा च्या धरतीवर कृषी विभागामार्फत राबविण्यात याव्यात अश्या कृषी विषयक सुधारणांही सुचवल्या. यावेळी या आढावा बैठकीला राज्यमंत्री संजय बनसोडे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आमदार ज्ञानराज चौगुले, बाबासाहेब पाटील, कैलास पाटील, सीईओ अभिनव गोयल
औशाचे तहसिलदार शोभा पूजारी, एम डी एम अविनाश कांबळे कृषी विभागाचे अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.