करणी सेनेच्या कर्नाटक शाखेचे उदघाटन

 करणी सेनेच्या कर्नाटक शाखेचे उदघाटन 


बस्वकल्यानं 

महाराष्ट्र राज्य करणी सेनेच्या टीमची महाराष्ट्र राज्याबाहेर धडक 








करणी सेनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई राजपूत, महाराष्ट्र प्रदेश संघटक अनिलसिंह जमादार, मराठवाडा कार्यध्यक्ष जयपालसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुराजपाल अम्मूजी , उपाध्यक्ष मधूकरप्पा ठोमसे, राष्ट्रीय महामंत्री संजय राणा नाईक, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवीचंद बारवाल, युवा प्रदेशाध्यक्ष गिरीशसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली काल करणी सेनेची कर्नाटक राज्यात शाखा उदघाटन करण्यात आले.

 यावेळी बस्वकल्याण येथील राजपूत समाज उपस्थिती होता. यावेळी राजुसिंह हजारी यांना कर्नाटक राज्य कार्यध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.तर करणी सेना महिला आघाडीच्या प्रदेश सचिवपदी डॉ. भुवनेश्वरी देवी श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्ती चे पत्र करणी सेना महिला प्रदेश अध्यक्ष संध्याताई राजपूत, प्रदेश संपर्क प्रमुख अनिलसिंह जमादार, मराठवाडा कार्याध्यक्ष जयपालसिंह ठाकूर, करणी सेना लातूर शहरी जिल्हाध्यक्ष जगदिशसिंह परदेशी, करणी सेना लातूर महिला जिल्हाध्यक्ष सौ वंदना बायस, उस्मानाबाद जिल्हा युवा उपाध्यक्ष विनयसिंह राजपूत, जिल्हा सचिव विनोदसिंह बायस यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी बस्वकल्याण सह आसपासच्या 10 गावातील राजपूत समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या